Bhiwandi Police Saam tv
महाराष्ट्र

Bhiwandi Police : ३१ कोटी ८४ लाखाचा एमडी ड्रग्स जप्त; भिवंडी पोलिसांची मोठी कारवाई, दोघेजण ताब्यात

Thane news : आजही मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची तस्करी केली जात असल्याचे भिवंडी पोलिसांनी केलेल्या कारवाईतून समोर आले आहे. तसेच यात मोठे रॅकेट असल्याची शक्यता देखील पोलिसांकडून वर्तविण्यात आली आहे

विकास काटे, ठाणे

ठाणे : अंमली पदार्थांची तस्करी करण्यास बंदी असताना देखील त्याची वाहतूक केली जात आहे. अशात भिवंडीत कारमधून एमडी ड्रग्सची तस्करी करताना भिवंडी पोलिसांनी सापळा रचत कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे १५ किलो ९२४ ग्रॅम वजनाचा एमडी अमली पदार्थाचा साथ जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत इतक्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ आढळल्याने खळबळ उडाली आहे. 

पोलिसांना गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार वाहन रांजणोली भिवंडी बायपासजवळ या ठिकाणी दोन इसम अमली पदार्थ विक्रीकरिता येणारा असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर पोलिसांनी महामार्गावर सापळा रचून कारवाई केली आहे. यात दोन सराईत आरोपींना वाहनांसह अटक केली असून ३१ कोटी ८४ लाख ८० हजार रुपये किमतीचा १५ किलो ९२४ ग्रॅम वजनाचा अमली पदार्थ गुन्हे शाखा घटक दोन भिवंडी पथकाने जप्त केला. 


दोघा आरोपींवर अनेक गुन्हे दाखल 
सदरच्या कारवाई दरम्यान तनवीर अहमद कमर अहमद अन्सारी व महेश हिंदुराव देसाई या दोन तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. यातील आरोपी तनवीर अन्सारी याच्या विरोधात यापूर्वी मुंब्रा पोलीस ठाणे, डायघर पोलीस ठाणे, भायखळा पोलीस ठाणे अशा विविध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तर आरोपी महेश हिंदुराव देसाई यांच्यावर देखील कोल्हापूर पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत.

गुन्ह्यात वापरलेल्या गाडीवर नगरसेवकाचा लोगो 

सदर आरोपी ठाणे मुंबई परिसरात अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी घेऊन आले होते. यात आणखीन काही जणांचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात असून त्यांचा देखील पोलीस प्रशासन तपास घेत आहे. तर या गुन्ह्यात वापरलेली कार ही आरोपी तनवीर याची असून दुसऱ्या कारबाबत अधिक तपास पोलीस प्रशासन करत आहेत. मुख्य म्हणजे या गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या गाडीवर महानगरपालिकेच्या नगरसेवकांचा लोगो लावण्यात आल्याचे समोर आले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, भुजबळांची नाराजी दूर करणार - एकनाथ शिंदे

Mukta Barve: बघ हसली, मोहरली, खुलली कळी मोगऱ्याची...

Maratha Reservation: मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर छगन भुजबळ आक्रमक; बोलावली तातडीची बैठक, मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत|VIDEO

Prepaid Plan: स्वस्तात मस्त प्लॅन! १९९ रुपयांत २८ दिवसांसाठी दररोज २ जीबी डेटा अन् बरंच काही...

Hans Mahapurush Rajyog: दिवाळीपूर्वी गुरु बनवणार हंस महापुरुष योग; 'या' राशींसाठी करियरमध्ये मिळणार उत्तम संधी

SCROLL FOR NEXT