thane crime news 15 year old girl was physically assaulted by 5 people in shahapur Saam TV
महाराष्ट्र

Crime News: संतापजनक! १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ५ जणांकडून सामूहिक अत्याचार; काळीमा फासणारी घटना

Shahapur Crime News: एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ५ नराधमांनी सामूहिक अत्याचार केला. पीडितेच्या भावाने हा प्रकार उघडकीस आणला.

Satish Daud

फैय्याज शेख, साम टीव्ही

Shahapur Crime News

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ७ नराधमांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच शहापूर तालुक्यातही महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना घडली. एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ५ नराधमांनी सामूहिक अत्याचार केला. पीडितेच्या भावाने हा प्रकार उघडकीस आणला. याप्रकरणी शहापूर पोलिसांत आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  (Latest Marathi News)

गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाले असून पोलीस (Police) त्यांचा शोध घेत आहेत. आरोपींमध्ये ४ मुले अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. प्राप्त माहितीनुसार, पीडित मुलगी अघई भागातील रहिवासी असून तिचे आई-वडील मोलमजुरी करतात.

ते दररोज सकाळी कामासाठी घरातून निघून जायचे. त्यावेळी पीडित मुलगी आणि तिचा लहान भाऊ असे दोघेच घरात असायचे. याच गोष्टीचा फायदा परिसरात राहणाऱ्या ५ मुलांनी घेतला. पीडितेचे आई-वडील मजुरीच्या कामावर निघून गेल्यानंतर आरोपी घरी यायचे.

भावाच्या नजरेसमोरच पीडितेला घरातून उचलून निर्जनस्थळी घेऊन जायचे. तिथे तिच्यावर आळीपाळीने बलात्कार (Crime News) करायचे. गेल्या महिन्याभरापासून हा प्रकार सुरू होता. दरम्यान, पीडितेच्या भावाने या संपूर्ण प्रकाराची माहिती आई-वडीलांना सांगितली.

मुलीवर अत्याचार झाल्याचं कळताच त्यांच्या पायाखालची जमीनच सकरली. आई-वडिलांनी तातडीने शहापूर पोलीस ठाणे गाठत यासंदर्भात तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या पाचही आरोपी फरार असून पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी दोन पथके रवाना केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नाशिक जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपलं

Kareena Kapoor : कोल्हापुरी चप्पल अन् समुद्रकिनारा; करीनाचा देसी स्वॅग, Pradaला टोमणा मारत म्हणाली...

Somwar Upay: सोमवारच्या दिवशी करा 'या' सोप्या उपायांनी मिळवा सुख-शांती; भगवान शंकरही होतील प्रसन्न

Raw Banana Curry Recipe: फक्त काही मिनिटांत बनवा हिरव्या केळ्याची स्वादिष्ट करी, वाचा स्टेप-बाय-स्टेप रेसिपी

Accident: वारकऱ्यांना घेऊन जाणारी एसटी बस रस्त्यावर उलटली, ३० प्रवासी गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT