छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर तीनच दिवसातं त्याच किल्ल्यावर पुन्हा महाराष्ट्राला लाज आणणारी घटना घडलीय. किल्ल्यावर आंदोलन आणि पाहणी करण्याच्या नावाखाली गेलेल्या ठाकरे आणि राणेंच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. हा राडा का झाला ? राड्यामुळे काय नुकसान झालं? कुणामुळे राडा थांबला यावरचा हा विशेष रिपोर्ट..
मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यानं महाराष्ट्राची लाज कमी वेशीला टांगली गेली होती की काय ठाकरे आणि राणेंच्या कार्यकर्त्यांनी किल्ल्यावरच राडा करून त्य़ात आणखीनच भर घातली. राजेंचा पुतळा पुतळा कोसळल्यानं मविआनं मालवण बदंची हाक दिली. त्यानंतर राजकोट किल्ल्यावर निषेध आंदोलन आयोजित केलं.
या आंदोलनासाठी आदित्य ठाकरे आणि त्यांचे कार्यकर्ते किल्ल्यावर आले. मात्र त्याआधीच या किल्ल्यावर पाहणी करण्यासाठी भाजप खासदार नारायण निलेश राणेंसह उपस्थित होते. त्यामुळे ठाकरे आणि राणे समर्थक आमनेसामने आले आणि किल्ल्यावर सुरू झाला हायहोल्टेज ड्रामा. निलेश राणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी किल्ल्यात येणारा मुख्य रस्त्या अडवला. पोलिसांशी त्यांनी हुज्जतही घातली. तर आदित्य ठाकरेंनीही मुख्य रस्त्यानंच येण्याचा हट्ट धरला. त्यामुळे दोघे आणि त्यांचे कार्यकर्ते आमनेसामने आले आणि पोलिसांसमोरच दोन्ही गटांत तब्बल दोन तास तुफान राडा सुरू होता.
हा राडा सुरू असतानाच पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी धाव घेतली. राणे पिता-पुत्रांची समजूत काढली आणि परिस्थिती काहीशी निवळली. राणे समर्थकांमुळे किल्ल्यावर राडा झाल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला. तर आम्ही काहीही केलं नाही. केलं असतं तर एकालाही घरी पोहचू दिलं नसतं असा दमच राणेंनी राडयानंतर भरला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.