पुतळा बनवणाऱ्या कंपनीविरूद्ध गुन्हा दाखल
Shivaji Maharaj Statue Saam Tv

Shivaji Maharaj Statue : छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला; शिल्पकार, कंत्राटदारावर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा

FIR Against company which manufactures Shivaji Maharaj Statue : मालवणमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना समोर आली. हा पुतळा बनवणाऱ्या कंपनीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळतेय.
Published on

रणजित माजगांवकर, साम टीव्ही कोल्हापूर

सिंधुदुर्गमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५ फूट उंचीचा असलेला पुतळा कोसळल्याची घटना २६ ऑगस्ट रोजी घडली होती. घटनेनंतर हा पुतळा बनवणाऱ्या शिल्पकार, कंत्राटदारावर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. नेमकं हा पुतळा कोणी बनवला होता, या कंपनीचा मालक कोण आहे? याबाबत आपण सविस्तर जाणून घेवू या.

चेतन पाटील संपर्क क्षेत्राबाहेर .

छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा मेसर्स आर्टिस्ट्री नावाच्या कंपनीने तयार केला होता. या कंपनीचा मालक जयदीप आपटे असल्याचं समोर आलंय. जयदीप आपटे यांनी सप्टेंबर २०२३ मध्ये पुतळा बनवण्याचं काम सुरू केलं होतं. डिसेंबरपर्यंत हे काम पूर्ण झालं होतं. त्यानंतर पंतप्रधान मोदींच्या हस्ते या पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलं होतं. तर एफआयआरमध्ये स्ट्रक्चर कन्सल्टंट चेतन पाटील यांचं देखील नाव आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं स्ट्रक्चर कन्सल्टंट काम पाहणारे चेतन पाटील संपर्क क्षेत्राबाहेर असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. चेतन पाटील यांचा मोबाईल बंद असून ते दोन दिवसांपासून संपर्काबाहेर असल्याची माहिती मिळतेय.

एफआयआरमध्ये नेमके आरोप काय?

एफआयआरमध्ये जयदीप आपटे आणि स्ट्रक्चर कन्सल्टंट चेतन पाटील यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज हे देशाचे राष्ट्रपुरूष आहेत. या पुतळ्याची सुरक्षितता विचारात घेवून काळजी घेणं गरजेचं होतं. पुतळा बनवणारे शिल्पकार आणि स्ट्रक्चर कन्सल्टंट यांना पुतळा कोसळल्यास जीवितहानीसोबत मोठं नुकसान होऊ शकतं, याची पूर्ण कल्पना होती. तरीही त्यांनी पुतळ्याच्या उभारणीकडे दुर्लक्ष केलं, निकृष्ट दर्जाची उभारणी केली, असं म्हटलंय.

पुतळा बनवणाऱ्या कंपनीविरूद्ध गुन्हा दाखल
Shivaji Maharaj Statue : 'शिवरायांचा पुतळा हा आठ महिन्यात पडणं हा अपघात नाही, तर भ्रष्टाचार आहे'

मानवी मृत्यू घडवून आणण्याचा प्रयत्न

निकृष्ट बांधकाम करून पुतळ्यासाठी शासनाकडून निधी घेतला, शासनाची फसवणूक केलीय. तसंच सार्वजनिक संपत्तीचं नुकसान केलंय. चुकीच्या पद्धतीने पुतळा उभा करून मानवी मृत्यू घडवून आणण्याचा प्रयत्न केलाय , असं देखील एफआयआरमध्ये नमूद केलंय. तसंच २० ऑगस्ट रोजी नियमित पाहणी करत असताना पुतळ्याच्या कामासाठी वापरण्यात आलेल्या नटबोल्टला गंज लागल्याचं समोर आलं होतं, याची माहिती संबंधित कंपनीला मेलद्वारे कळवले होते, असं तक्रारदाराने म्हटलंय.

पुतळा बनवणाऱ्या कंपनीविरूद्ध गुन्हा दाखल
Shivaji Maharaj Statue : दुकानं बंद...शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर वातावरण तापलं, 'मालवण बंद'ची हाक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com