Sanjay Raut’s statement on Raj Thackeray sparks confusion — MNS leaders express anger, Raut clarifies later. Saam Tv
महाराष्ट्र

Raj-Uddhav Alliance: राज ठाकरेंच्या विधानाबाबत राऊतांचा नेमका घोळ काय झाला? मनसे नेते नाराज का?

MP Sanjay Raut Statement on Raj Thackeray: खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे काँग्रेसला सोबत घेण्यास उत्सुक असल्याचे विधान केलं होतं. यावरून मनसेत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. त्यानंतर संजय राऊत यांनी राज ठाकरेंनी मेसेज देत स्पष्टीकरण दिलं.

Bharat Jadhav

  • राज ठाकरे काँग्रेससोबत जाणार अशी चर्चा राऊतांच्या विधानामुळे रंगली.

  • उद्धव आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चांना वेग आला आहे.

  • विधानवरून गैरसमज वाढताच संजय राऊत यांनी राज ठाकरेंना फोन केला.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मनसे आणि शिवसेना ठाकरे गट युती होणार असल्याची म्हटलं जात आहे. मनसे महाविकास आघाडीत सामील होणार असल्याबाबतच्या चर्चांनी जोर धरलाय. काँग्रेसलाही सोबत घेतलं पाहिजे अशी इच्छा राज ठाकरेंचीही असे विधान संजय राऊत यांनी केलं होतं. त्यावरून मनसे नेते नाराज झाले. त्यानंतर झालेला घोळ लक्षात येताच ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतांनी राज ठाकरेंना फोन करत आपण, असं बोललो नाही असं सांगितलं.

नेमका घोळ काय झाला? काय म्हणाले होते संजय राऊत?

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या ठाकरे बंधूंनी एकत्र यावेत. आगामी निवडणुकीत राजकीय युती करावी, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. पण महाविकास आघाडी युतीला पाठिंबा देणार का, यावर तर्क-वितर्क सुरू आहेत. त्याचवेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेस आणि महाविकास आघाडीला नव्या भिडूची गरज नसल्याचं म्हटलं होतं. मनसेला महाविकास आघाडीत घ्यायचे असल्यास तो निर्णय दिल्लीतून होईल, असेही ते म्हणाले होते.

हर्षवर्धन सपकाळ यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना खासदार संजय राऊत यांनी मोठे विधान केलं. त्याच विधानाने मनसे नेते नाराज झालेत. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसलाही सोबत घेतलं पाहिजे, अशी इच्छा स्वतः राज ठाकरे यांची आहे. राज्यात प्रत्येकाचे एक स्थान आहे. ज्या प्रकारे शिवसेनेचे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे, शरद पवार साहेबांचे, डाव्या पक्षांचे, तसेच काँग्रेस सुद्धा महाराष्ट्रातला एक महत्त्वाचा पक्ष असून त्यांनाही शिष्टमंडळात काँग्रेसचा समावेश होणे गरजेचे आहे, असे संजय राऊत म्हणाले होते.

राऊतांचा राज ठाकरेंना मेसेज काय?

त्यानंतर राऊत यांच्या या विधानानंतर राज ठाकरे यांची काँग्रेससोबत जाण्याची इच्छा असल्याचा अर्थ काढण्यात आला. यानंतर मनसेच्या नेत्यांनी माध्यमांसमोर तीव्र प्रतिक्रिया दिल्या. आमच्या पक्षांची भूमिका पक्षाचे प्रवक्ते आणि पक्ष अध्यक्ष राज ठाकरे हेच मांडतील. दुसरे कोणी नाही. तर निवडणूक आयोगाच्या भेटीसाठी जाणाऱ्या शिष्टमंडळात काँग्रेसलाही बोलवा असं राज ठाकरे म्हणालेत, असं मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले.

याप्रकरणी गैरसमज वाढल्याचे लक्षात येताच संजय राऊत यांनी तातडीने राज ठाकरे यांना मेसेज पाठवला. या मेसेजमध्ये संजय राऊत यांनी मी असे काहीही बोललो नाही, असे स्पष्ट केले. माझ्या वक्तव्याचा तो अर्थ नसल्याचं राऊतांनी आपल्या मेसेजमधून सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाशिकमध्ये तब्बल 3 लाख दुबार मतदार; बोगस मतदारविरोधात शिंदेसेनाच मैदानात

Election Commission: नगर परिषद, नगर पंचायती निवडणूक; उमेदवारांना किती पैसे खर्च करता येतील?

Fact Check : मुंबईतील सोसायट्यांमध्ये फिरतंय भूत? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

Junnar leopard Attack : बिबट- माणसांचा संघर्ष उफाळला, पुण्यात बिबट्यानं घेतला 60 जणांचा बळी; नागरिक म्हणतात गोळ्याच घाला

Gangster reels : रिलस्टार बनतायेत गँगस्टर? दहशतीच्या रिल्स बनवाल जेलमध्ये जाल, VIDEO

SCROLL FOR NEXT