Sanjay Raut News  Saam Tv
महाराष्ट्र

Sanjay Raut News : भाजपचा प्रत्येक बालेकिल्ला उध्वस्त करू; कसब्यातील धंगेकरांच्या विजयानंतर संजय राऊत गरजले

'भाजपचा प्रत्येक बालेकिल्ला उध्वस्त करू, अशा शब्दात संजय राऊत यांनी धंगेकरांच्या विजयावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

साम टिव्ही ब्युरो

रणजीत माजगांवकर

Sanjay Raut News : भाजप आणि महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या कसबा पेठमधून काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांनी भाजपच्या हेमंत रासने यांचा पराभव केला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या विजयानंतर भाजपला मोठा धक्का बसला आहे. कसबा पेठ पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर यांचा विजय झाल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

'भाजपचा प्रत्येक बालेकिल्ला उध्वस्त करू, अशा शब्दात संजय राऊत यांनी धंगेकरांच्या विजयावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत सध्या कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

संजय राऊत म्हणाले, 'कसब्यातील निकाल म्हणजे परिवर्तनाची नांदी आहे. देवेंद्र फडणवीस यांना आता कळाले असेल की खरी शिवसेना कुठे आहे. चिंचवडमध्ये तिसरा उमेदवार उभा करून भाजपनं मतांची फाटाफूट केली. भाजपबरोबर आतापर्यंत शिवसेना होती म्हणून भाजपचे बालेकिल्ले सुरक्षित होते. इथून पुढं भाजपचा प्रत्येक बालेकिल्ला उध्वस्त करू'.

कसब्यात झालेला विजय फार बोलका आहे : आदित्य ठाकरे

दरम्यान, कसबा पेठ निवडणुकीतील रवींद्र धंगेकर यांच्या विजयावर ठाकरे गटाचे नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. आदित्य ठाकरे म्हणाले, 'महाराष्ट्रात जे काही सुरू आहे ते जनतेला मान्य नाही. कसबा मध्ये आमचा विजय झाला आहे.वाढती महागाई आहे. महाराष्ट्रातले निघून चाललेले उद्योग आहेत'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : दिल्ली विमानतळावर इंडिगो फ्लाईटमध्ये २५० हून अधिक प्रवासी अडक

Navale Bridge: एक चूक पडेल महागात! नवले पुलावरील अपघातांनंतर मोठा निर्णय, पुणे पोलिसांकडून नवीन नियमावली जाहीर

पनवेलजवळ अपघात, रेल्वे ट्रॅकवरून मालगाडी घसरली, VIDEO

Palak Kofta Recipe: घरीच बनवा कुरकुरीत पालक कोफ्ते; चव चाखून विसराल हॉटेलची डिश

Putin india tour : पुतिन यांच्या भारत दौऱ्याने काय मिळणार? या क्षेत्रात होणार फायदा, ८ महत्वाचे करार गेमचेंजर ठरणार?

SCROLL FOR NEXT