Yogesh Kadam Vs Aniket Kadam Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: कोकणात आमदारकीवरून भावकीत शिमगा, योगेश कदमांना भाऊ अनिकेतची टशन?

Satish Kengar

भरत मोहोळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

महाराष्ट्राला काका पुतण्याचा संघर्ष नवा नाही. त्यातच आता आणखी भर पडलीय ती रामदास कदम विरुद्ध अनिकेत कदम या काका पुतण्या संघर्षाची... अनिकेत कदमांनी थेट खेड-दापोलीत बॅनर लावत काका रामदास कदमांच्या विरोधातच आव्हान उभं केलंय. विशेष म्हणजे या बॅनरवर योगेश कदमांचे कट्टर विरोधक संजय कदमांचा फोटो आहे. त्यामुळे कोकणात आमदारकीवरून शिमगा रंगणार असल्याचं चित्रंय. अनिकेत कदम कोण आहेत, हे जाणून घेऊ..

कोण आहेत अनिकेत कदम?

अनिकेत हे रामदास कदमांचे भाऊ सदानंद कदम यांचे पुत्र आहेत. सदानंद कदम हे उद्योजक आहेत. सदानंद कदमांच्या शहर विकास आघाडीचं खेड नगरपरिषदेवर वर्चस्व आहे. अनिकेत कदमांनी थेट मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. अनिकेत कदम योगेश कदमांच्या विरोधात करणार काम करू शकतात.

लोकसभा निवडणुकीत कोकणात ठाकरे गटाचा पराभव झाला. मात्र आता विधानसभेपूर्वी ठाकरे गटाने राजकीय डाव टाकत रामदास कदमांचे पुतणे अनिकेत कदमांना गळाला लावलंय. तर दापोली मतदारसंघात अनिकेत कदमांच्या वाढदिवसानिमित्त बॅनर झळकलेत.. त्यावरून काका-पुतण्या संघर्षाची चर्चा रंगलीय..

दरम्यान, दापोलीतून 2019 च्या विधानसभेला योगेश कदमांचा अवघ्या 13 हजार मतांनी विजय झाला होता. मात्र आता खेड नगरपरिषदेवर वर्चस्व असलेल्या चुलत भावानेच योगेश कदमांना आव्हान दिल्याने दापोलीतून योगेश कदमांची विजयाची वाट अवघड बनण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

Maharashtra News Live Updates: राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! बँकेच्या कर्मचाऱ्यांना आजीवन मिळणार १०००० रुपये पेन्शन

Mumbai local train update : मुंबईकरांनो लक्ष द्या! मध्य आणि ट्रान्स हार्बरवर विशेष पॉवर ब्लॉक; अनेक लोकल फेऱ्या रद्द, वाचा वेळापत्रक

SCROLL FOR NEXT