19 वर्षांचं राजकीय वैर विसरुन राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसमोर युतीचा प्रस्ताव ठेवलाय.. तर त्याला उद्धव ठाकरेंनीही सकारात्मक प्रतिसाद दिलाय.. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र आल्यास राज्यातील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे.... ते नेमकं कसं? पाहूयात...
विधानसभा निवडणुकीत मनसे आणि ठाकरे गटाचा दारुण पराभव
राज-उद्धव एकत्र आल्यास दोन्ही पक्षांना फायदा
शहरी भागात राज ठाकरेंना मानणारा वर्ग
आगामी महापालिका निवडणुकीत फायदा होऊ शकतो
ठाकरे बंधू एकत्र आल्यास मुंबई महापालिका राखणं शक्य होऊ शकतं
उद्धव ठाकरेंचं संघटनकौशल्य, राज ठाकरेंचं भाषण पक्षवाढीसाठी फायद्याचं
मात्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यामागे नेमकं कोणतं कारण आहे? हे जाणून घेतलंय सकाळ माध्यम समुहाचे मुख्य संपादक निलेश खरे यांच्याकडून...
विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या आमदारांची संख्या 56 वरुन 20 वर आली.. तर राज ठाकरेंना भोपळाही फोडता आला नाही.. तर 2017च्या पालिका निवडणुकीत ठाकरे गटाला काठावरचं बहुमत मिळालं होतं... तर मनसेनं 7 जागा जिंकल्या होत्या... मात्र ठाकरेंच्या सेनेची शकलं झाल्यानं..आणि मनसेच्या अधःपतनानंतर आता ब्रँड ठाकरे संकटात सापडलाय... मुंबईत विधानसभेच्या मतांचं गणित कसं होतं पाहूयात...
मनसे असो वा ठाकरेंची सेना राजकारणात जीवंत राहायचं असेल तर तडजोडी कराव्याचं लागतात...त्यात दोन्ही पक्षांसाठी प्रश्न अस्तित्वाचा आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या हितासाठी आणि मराठी माणसासाठी आम्ही एकत्र येतोय असं ठाकरे बंधुंनी म्हटलं तर नवलं ते काय?...शेवटी सर्व्हायवलचा प्रश्न आला की घरचेच जवळचे वाटतात हेच खरं...बाकी आगामी राजकारणावर याचे दुरगामी परिणाम होणार हे अटळ...त्यामुळे ठाकरे खरंच एकत्र येणार का? हेच पाहायचं
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.