Jalgaon TET Exam Scam Saam tv
महाराष्ट्र

TET Scam: जळगावमधील शिक्षकांना पगार न देण्याचे आदेश; शिक्षकांमध्ये खळबळ

टीईटी परीक्षांमध्ये गैरप्रकार करीत अपात्र परीक्षार्थ्यांना पात्र केल्याचे प्रकरण उजेडात आलं आहे.

संजय महाजन, साम टीव्ही, जळगाव

जळगाव: 2018-19 आणि 2020 मध्ये झालेल्या टीईटी परीक्षांमध्ये गैरप्रकार करीत अपात्र परीक्षार्थ्यांना पात्र केल्याचे प्रकरण उजेडात आलं आहे. या प्ररणात सहभागी असलेल्या शिक्षकांचे (Teachers) वेतन न देण्याचे आदेश शिक्षण संचालकांनी काढले आहेत.

त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील 138 शिक्षकांचे पगार थांबविण्यात आले आहेत . यामध्ये प्राथमिकचे 67 तर माध्यमिकच्या 71 शिक्षकांचा समावेश आहे. टीईटी गैरप्रकारात (TET Scam) अपात्र असलेल्या शिक्षकांविरोधात कारवाई करण्याचे काम सुरू असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे. त्यामुळे आता अपात्र शिक्षकाचे धाबे दणालेले आहेत.

पाहा व्हिडीओ -

दरम्यान, जळगावमधील (Jalgaon) अपात्र उमेदवारांची यादी मॅपिंगसाठी पाठविण्यात आली होती . अपात्र उमेदवारांपैकी 447 उमेदवार हे राज्यातील शाळांमध्ये शिक्षण सेवक , सहशिक्षक, मुख्याध्यापक पदावर कार्यरत असल्याचे समोर आले होते.

यांना वेतन अदा न करण्याचे सांगण्यात आले आहे . दरम्यान, यात जळगाव जिल्ह्यातील प्राथमिक विभागाचे 67 तर माध्यमिक विभागाच्या 71 शिक्षकांचा समावेश आहे .

पगार केल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई

टीईटी परीक्षेत गैरप्रकाराने उत्तीर्ण होऊन जळगाव जिल्ह्यातील प्राथमिक , माध्यमिकचे 138 जण विविध शाळांवर रुजू झाले होते. आता शासनाने या शिक्षकांचे पगार बंद करण्याचे आदेश दिले आहे . या शिक्षकांचे पगार केल्यास शिक्षणाधिकारी, वेतन पथक अधीक्षकांवर कारवाई करण्याचा इशारा शासनाने दिला आहे.

काय आहे प्रकरण -

2019 मधील शिक्षक पात्रता परीक्षेतील (TET Scam) गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर जवळपास सात हजार 874 उमेदवारांना अपात्र ठरवण्यात आलं आहे. त्यापैकी 576 उमेदवार आजही विविध शाळामध्ये कार्यरत असल्याचे समोर आलं आहे. या 576 उमेदवारांचे शालार्थ आयडी शिक्षण संचलन संचालनालयाने गोठवले आहेत. तसंच अपात्र शिक्षकांचे वेतन ऑगस्टपासून रोखण्याचे निर्णय घेण्यात आले आहेत.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS : पहिल्या सामन्यात मार्नस लाबुशेनकडून चिटींग? मोहम्मद सिराज संतापला, वादात कोहलीचीही उडी, पाहा Video

Maharashtra Assembly Election Result : धाकधूक अन् टेन्शन वाढलं! १०० मतदारसंघात काटें की टक्कर, काहीही होऊ शकतं, कोण ठरणार किंगमेकर?

VIDEO : अब की बार कुणाचं सरकार? काही मिनिटांत मतमोजणीला सुरुवात

National Cashew Day: जागतिक काजू दिवसाचा इतिहास, महत्व आणि साजरा करण्याच्या पद्धती

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : बारामती ही पवारांची आहे- श्रीनिवास पवार

SCROLL FOR NEXT