Police Death: पोलीस दलात आत्महत्येचं सत्र काही थांबेना! ४ दिवसात ३ आत्महत्या, काय आहे कारण?

Mental Health Crisis in Police Department: चार दिवसांच्या कालावधीत एकूण तीन पोलिसांनी आत्महत्या केली आहे.पोलीस दलातील आत्महत्येचं सत्र थांबताना दिसत नाहीये. आत्महत्येमागील काय कारणे आहेत, जाणून घेऊ.
Mumbai Andheri Police
Mental Health Crisis in Police DepartmentSaam Tv News
Published On
Summary
  • मुंबईत चार दिवसांत तिन्ही पोलिसांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या.

  • अंधेरी पोलिस लाईन परिसरात 45 वर्षीय पोलिस कर्मचाऱ्याने गळफास घेतला.

  • आजारपण, कुटुंबापासून दूर राहणं आणि मानसिक तणाव ही कारणं समोर आली.

  • पोलिस दलातील वाढत चाललेल्या आत्महत्यांमुळे मानसिक आरोग्यावर गंभीर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय.

अंधेरी पूर्वेतील नवीन पोलीस लाईन परिसरात एका पोलीस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आलीय. या घटनेनंतर आत्महत्या पकडून मागील चार दिवसात एकूण तीन पोलिसांनी आत्महत्या झाल्याच्या घटना झाल्या आहेत. मुकेश देव (45) असं आत्महत्या केलेल्या पोलिसाचे नाव आहे. घरात कोणी नसताना त्यांनी गळफास घेत आत्महत्या केलीय. आजारपण आणि कुटुंबीय सोबत नव्हते, या तणावातून त्यांनी आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे.

या आत्महत्येची घटना पकडून मागील चार दिवसात एकूण तीन पोलिसांनी आत्महत्या केल्याने पोलीस दलातील मानसिक तणाव, कामाचा ताण, वैयक्तिक समस्या यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांच्या या वाढत्या आत्महत्यांबद्दल समाजातील विविध स्तरांतून चिंता व्यक्त केली जातेय.

असं टोकाचं पाऊल उचलण्यामागे कामाच्या ठिकाणी ताण असणं, वैयक्तिक कारणं, आणि मानसीक तणाव, आणि आजारपण असल्याचं निरदर्शनात आलंय. काही दिवसापूर्वी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून पोलीस कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली होती. मलाडमधील कुरार पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली होती.

सुभाष कांगणे असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचं नाव होतं. मानसिक छळाला कंटाळून कांगणे यांनी आत्महत्या केली. अशी शंका उपस्थित केली गेली. पोलीस कर्मचाऱ्याच्या कुटुंबानं वरिष्ठ अधिकाऱ्यांवर आरोप केला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या छळाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असल्याचा आरोप कुटुंबाकडून करण्यात आला.

Mumbai Andheri Police
Shocking News : पुणे हादरलं! अल्पवयीन मुलाकडून आईच्या प्रियकराची हत्या

आज अंधेरी पूर्वीमध्ये पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केलीय. त्यांनी आजारपण आणि एकटेपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे. मुकेश दत्तात्रय देव यांना तीन महिन्यांपासून कावीळचा आजार होता. कावीळचा आजार असल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. या उपचारादरम्यान त्यांची पत्नी आपल्या दोन मुलांना घेऊन माहेरी निघून गेल्यामुळे ते तणावात होते. शनिवारी दुपारी घरात एकटे असताना त्यांनी पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली.

Mumbai Andheri Police
Elvish Yadav House Firing: धावत धावत आले अन् धाड धाड धाड झाडल्या दोन डझनभर गोळ्या, गोळीबाराचा CCTV व्हिडिओ व्हायरल

आत्महत्येपूर्वी त्यांनी सुसाईड नोट लिहिलीय. "आजार आणि कुटुंबापासून दूर राहिल्याच्या तणावामुळे आत्महत्या करत आहे" असल्याचं म्हटलंय. तर ना काही दिवासाआधी अशीच घटना घडली होती. अकोला पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विषाचे सेवन करून आत्महत्या केल्याची घडली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com