Mahalaxmi Vrat 2025 : महालक्ष्मी व्रताची तारीख, पूजा विधी, महत्व घ्या जाणून

Hindu Festival : महालक्ष्मी व्रत २०२५, ३१ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर दरम्यान पाळले जाईल. पूजा साहित्य, विधी, नियम आणि या व्रताचे महत्व जाणून घ्या. सुख, समृद्धी व सौभाग्य लाभासाठी विशेष उपवास.
pooja items
Mahalaxmi Vrat 2025saam tv
Published On

महालक्ष्मी व्रत हे हिंदू धर्मात एक महत्वाचे व्रत मानले जाते. दरवर्षी धन, सुख, समृद्धी, सौभाग्य आणि यश प्राप्तीसाठी हे व्रत केले जाते. यंदा महालक्ष्मी व्रताची सुरुवात ३१ ऑगस्ट २०२५ रोजी होणार असून याचा शेवट १४ सप्टेंबर २०२५ रोजी होणार आहे. भाद्रपद शुक्ल अष्टमीपासून अश्विन कृष्ण अष्टमीपर्यंत १६ दिवस देवी महालक्ष्मीची विधीपूर्वक पूजा केली जाते. अशी श्रद्धा आहे की, या व्रतामुळे आर्थिक स्थिती सुधारते आणि दुर्बल किंवा गरीब माणूसही श्रीमंतीकडे वाटचाल करतो.

यंदा भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाची अष्टमी तिथी ३० ऑगस्ट रोजी रात्री १०.४६ वाजता सुरू होऊन १ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२.५७ वाजता समाप्त होणार नाही. चंद्रोदयाची वेळ दुपारी १.११ अशी आहे. संपूर्ण महालक्ष्मी व्रत १५ दिवस चालणार आहे. ज्यांना संपूर्ण १६ दिवस उपवास करणं शक्य नसतं त्यांनी व्रताचे पहिले तीन दिवस किंवा शेवटचे तीन दिवस पाळले तरी ते फलदायी मानले जाते.

व्रताच्या अखेरीस लाल कपड्यावर देवी लक्ष्मीची मूर्ती स्थापन केली जाते. रात्रीच्या वेळेस तारे आणि पृथ्वीला जल अर्पण करून देवीची स्थापना केली जाते. व्रत करणाऱ्या महिलांनी ब्राह्मणांना भोजन, दक्षिणा द्यावी आणि खीर अर्पण करून हवन करावे अशी परंपरा आहे. तसेच चंदन, कमळ, दुर्वा, नारळ, तांदूळ, लाल दोरा, सुपारी अशा विविध पूजावस्तू सोळा संख्येने एका नव्या टोपलीत ठेवून देवीला अर्पण केल्या जातात.

व्रताच्या शेवटी "क्षीरोदार्णवसंभूता लक्ष्मी चंद्र सहोदरा । व्रतेनापनेन संथं भवर्तोद्वपुबल्लभा ।" हा मंत्र उच्चारला जातो. श्रद्धेनुसार, या व्रताचे पालन करणाऱ्यांना जीवनात सुख, शांती आणि समृद्धी मिळते तसेच मृत्युनंतर लक्ष्मी लोकात आनंद लाभतो.

pooja items
WhatsApp Security : व्हॉट्सअ‍ॅप कधीच होणार नाही हॅक, सायबर एक्सपरर्टने दिला भन्नाट सल्ला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com