TET Exam Scam: Saam Tv
महाराष्ट्र

TET Exam Scam: टीईटी पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, नामांकित पोलिस प्रशिक्षण केंद्र चालवणाऱ्याला अटक

TET Paper Leak Case: टीईटी पेपरफुटी प्रकरणात आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात महाराष्ट्रातून नामांकित पोलिस प्रशिक्षण केंद्र चालवणाऱ्याला अटक करण्यात आली.

Priya More
  • टीईटी पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड

  • सोलापूरच्या पोलिस प्रशिक्षण संस्थाचालकाला अटक

  • सोलापुरातून प्रकाश पवारला अटक

  • टीईटी पेपरफुटी प्रकरणातील आरोपींची संख्या १६ वर

फैय्याज शेख, भिवंडी

टीईटी पेपर फुटी प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात आता महाराष्ट्र कनेक्शन समोर आले आहे. भिवंडी पोलिसांकडून पोलिस पूर्व प्रशिक्षण संस्था चालवणारा प्रकाश धनसिंग पवारला अटक करण्यात आली. या प्रकरणात आतापर्यंत आरोपींची संख्या १६ वर पोहचली आहे. प्रकाश पवारला भिवंडी न्यायालयात एस.एस.घोडके यांच्या न्यायालयासमोर हजर केले असता त्याला 15१५ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

प्रकाश पवार याची सोलापूरमध्ये पोलिस भरतीसह विविध स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण संस्था आहे. प्रकाश पवार यांनी अटक आरोपी सोनू जितेंद्र सिंगला विद्यार्थ्यांची काही कागदपत्रे दिल्याचा आरोप आहे. कागदपत्रे नेमक्या कोणत्या उद्देशाने देण्यात आली याचा पोलिस शोध घेत आहेत. या प्रकरणात आतापर्यंत 15 जणांना अटक करण्यात आली असून त्यांना १७ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान प्रकाश पवारला अटक केल्यानंतर आरोपींची संख्या १६ वर पोहोचली आहे

प्रकाश पवार याची सोलापूरमध्ये ध्रुव अकॅडमी नावाने पोलिस पूर्व भरती प्रशिक्षण संस्था असून २०१२ पासून तो ही संस्था चालवत आहे. जवळपास १५-२० वर्षांपासून तो विद्यार्थ्यांना पोलिस भरती आणि विविध स्पर्धा परीक्षासाठी मार्गदर्शन करणारी अकॅडमी चालवत होता अशी माहिती आहे. कोरोनामध्ये प्रकाशचे डोळे गेले. परंतु गोरगरिबांना मोफत पोलिस प्रशिक्षण मिळावे यासाठी प्रकाश पवारने पोलिस प्रशिक्षण केंद्र सुरू केले.

टीईटी पेपर फुटी प्रकरणात प्रकाश पवारला संशयित आरोपी म्हणून अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता १५ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याच्याकडे २६ विद्यार्थ्यांचे पेपर सापडले असून त्यामध्ये २० उत्तीर्ण झालेल्यांचे पेपर आढळून आले आहेत. त्यापैकी ५ पेपर टीईटी उत्तीर्ण झालेल्यांचे असल्याच्या संशयावरून त्यास पोलिसांनी अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

Plane Crash: प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळलं, २ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: डिजिटल पेमेंटवर लागणाऱ्या MDR शुल्कातून पेट्रोलपंपांना वगळा, CIPD ची मागणी

7 Grain Bhakri: वजन कमी आणि शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज खा ७ धान्यांची भाकरी; मिळताता हे आरोग्यादायी फायदे

SCROLL FOR NEXT