Kidnapping News Saam tv
महाराष्ट्र

चार कोटींच्या खंडणीसाठी विद्यार्थ्याचं अपहरण; पोलिसांनी जिल्हाभर नाकाबंदी केली, अन्...

दहावीत शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याचं तब्बल चार कोटींच्या खंडणीसाठी अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली होती.

लक्ष्मण सोळुंके

जालना : दहावीत शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याचं तब्बल चार कोटींच्या खंडणीसाठी (Extortion case) अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली होती. स्वयंम महावीर गादीया (१६) या विद्यार्थ्याचे अपहरण (student kidnapping) करण्यात आले होते. मंठा चौफुली परिसरातील पोतदार शाळा परिक्षा सेंटरवरून वॅगनर क्र.(MH 20,CS,4956) या कारमधून त्याचे अपहरण झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Police investigation) तपासाची सूत्र वेगानं फिरवत अवघ्या पाच तासांतच स्वयंमला शोधले असून कार चालकाला ताब्यात घेतलं आहे. तर अपहरण करणाऱ्या आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील मेडील व्यावसायिक महावीर गादिया यांचा 16 वर्षांचा मुलगा स्वंयम हा दहावीची परीक्षा देण्यासाठी पोद्दार शाळेच्या परीक्षा केंद्रावर गेला होता.मात्र साडेबारा वाजता परीक्षा संपल्यानंतर तो घरी परतलाच नाही. त्यानंतर स्वयंमच्या पालकांनी कार चालकाच्या मोबाईलवर कॉल केला.

त्यावेळी अज्ञात अपहरणकर्त्यांनी मुलगा पाहिजे असल्यास चार कोटी रुपये द्या,अशी मागणी पालकांकडे करुन अंबड चौफुली येथे बालावले.त्यानंतर अंबड शहरातही बोलावले असता त्याचवेळी आरोपी फरार झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी जिल्ह्यातील मुख्य रस्त्यांसह जिल्हाभरात नाकाबंदी करून चालकाचा मोबाईल ट्रेस केला. त्यानंतर पोलिसांना चालकाचा पत्ता सापडल्यावर अंबड रोडवरील शहापूर जवळ चालकाला ताब्यात घेवून स्वयंमची सुटका केली.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

खळबळ! निवडणूक मतदान तोंडावर अन् कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळले मतदान ओळखपत्र, आधार-पॅनकार्ड

Maharashtra Live News Update : नरेश अरोरा यांच्या कारवाईवर सुनिल तटकरे यांची पहिली प्रतिक्रिया

कल्याणमध्ये पुन्हा मोठा राडा; भाजप उमेदवाराच्या समोरच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला? व्हिडिओ व्हायरल

आम्ही राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांच्या पाठिशी; क्राइम ब्रांचच्या कारवाईनंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

Vijay Hazare Trophy: सेमीफायनमध्ये या ४ टीम्सने मारली दणक्यात एन्ट्री; पाहा कुठे आणि कधी रंगणार सामने

SCROLL FOR NEXT