- तबरेज शेख
नाशिक : नाशिक रोड उपनगर भागांमध्ये एका दहा वर्षे चिमुरडीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. या घटनेने संपूर्ण नाशिक शहर हादरले असून घटनेबाबत उपनगर पोलीस ठाण्यात पॉक्सो (POCSO) अंतर्गत व बाल लैंगिक अत्याचार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नाशिक (Nashik) रोड उपनगर भागात एक दहा वर्षाच्या चिमुरडीवर 28 वर्षीय संशयिताने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण नाशिक शहरात संतापाची लाट पसरली आहे. (Ten-year-old Girl sexually abused in Nashik)
हे देखील पहा :
सदर मुलगी ही आपल्या वडिलांसोबत शनिवारी (दि.१२) रात्रीच्या वेळी चक्कर मारायला बाहेर गेली होती. काही काळ चक्कर मारल्यानंतर तिच्या वडिलांनी तिला घरी जाण्यास सांगितले. मात्र, थोड्या वेळाने तिचे वडील घरी परतल्यानंतर मुलगी घरी नसल्याचे त्यांना समजले. त्यानंतर पोलिसांसोबत (Police) स्थानिक नागरिकांनी या मुलीचा शोध घेतला पण मुलगी कुठेही आढळून आली नव्हती. त्यानंतर रात्री उशिरा दीड वाजता श्वानपथकाला देखील पाचारण करण्यात आले होते. श्वान पथकाने देखील या मुलीचा शोध घेतला.
मात्र काही वेळाने सदर चिमुरडीचा शोध सुरू असताना परिसरातील एका गार्डन जवळ ही मुलगी मिळून आली त्यानंतर, एका व्यक्तीने त्या मुलीला याठिकाणी सोडल्याचं परिसरात चर्चा होती. यावेळी सदर मुलीसोबत अत्याचार केला गेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे या घटनेनं संपूर्ण नाशिक शहरात एकच खळबळ उडाली आहे .याबाबत उपनगर पोलिस ठाण्यांमध्ये पोस्को व बाल लैंगिक अत्याचार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून एका 28 वर्षीय संशयिताला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
या घटनेवरून नाशिक शहरात लहान मुलींचं देखील बाहेर वावरणं किती कठीण झालं आहे हे लक्षात येतेय. त्यामुळे कुठेतरी गुन्हेगारांवर नाशिक पोलिसांचा धाक हा कमी झाला असून गुन्हेगारांच्या मनात पोलिसांचा वचक राहिलाच नाही काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. या घटनेतील आरोपीला कठोरतील कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.
Edited By : Krushnarav Sathe
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.