पत्नीवर हल्ला करणाऱ्या पतीने स्वतःलाच मारली गोळी; आरोपीने बंदूक आणली कुठून?

चारित्र्यावर संशय आणि चोरीच्या संशयातून आरोपी सोमनाथ आणि त्याच्या पत्नीमध्ये वाद होत होते. सोमनाथने भररस्त्यात चाकूने वार करत तिला जखमी केलं होतं.
पत्नीवर हल्ला करणाऱ्या पतीने स्वतःलाच मारली गोळी; आरोपीने बंदूक आणली कुठून?
पत्नीवर हल्ला करणाऱ्या पतीने स्वतःलाच मारली गोळी; आरोपीने बंदूक आणली कुठून?SaamTvNews

डोंबिवली : डोंबिवली पुर्वेकडील दत्तनगर येथील गावदेवी मंदिराजवळ आरोपी सोमनाथ व त्याची पत्नी राहत असून चारित्र्यावर संशय आणि चोरीच्या संशयातून आरोपी सोमनाथ आणि त्याच्या पत्नीमध्ये वाद (Dispute) होत होते. या वादातून आठ तारखेला पुन्हा सोमनाथने पत्नीला (Wife) मारहाण केली. याबाबत तक्रार देण्यास पोलीस ठाण्यात जाणाऱ्या पत्नीवर सोमनाथने भररस्त्यात चाकूने वार करत तिला जखमी केलं होतं.

हे देखील पहा :

जखमी पत्‍नी वंदना हिला उपचारासाठी मुंबई (Mumbai) येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर डोंबिवली (Dombivli) रामनगर पोलीस ठाण्यात सोमनाथ विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सोमनाथ घटनेनंतर फरार झाला आणि पोलीस त्याचा शोध घेत होते. दरम्यान आरोपी सोमनाथ रविवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी आला. घराबाहेर लावलेले कुलूप तोडून तो घरात शिरला आणि बंदुकीने (Pistol) गोळी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

पत्नीवर हल्ला करणाऱ्या पतीने स्वतःलाच मारली गोळी; आरोपीने बंदूक आणली कुठून?
माझ्या पतीवर गुन्हा का दाखल केला? नवनीत राणा कडाडल्या!

यात आरोपी सोमनाथ गंभीर जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Police) तात्काळ घटना स्थळी धाव घेतली. दरम्यान सोमनाथ याला उपचारासाठी डोंबिवली एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, त्याने हे पिस्तुल मध्यप्रदेश (Madhya Pradesh) येथून आणले असून त्या पिस्तूलाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला.मात्र ही कशासाठी आणली होती? कोणाकडून घेतली हे प्रश्न अद्याप कायम आहे.

पत्नीवर हल्ला करणाऱ्या पतीने स्वतःलाच मारली गोळी; आरोपीने बंदूक आणली कुठून?
वकिलाच्या BMW गाडीला भीषण अपघात; चित्रपटातील दृश्यांप्रमाणे कारच्या कोलांट्या!

सोमनाथ देवकर याने त्याच्या पत्नीला (Wife) आठ तारखेला चारित्र्याच्या संशय घेऊन चाकूने वार करून जखमी केले होते आणि सदर आरोपी हा मिळून येत नव्हता. बरेच दिवस तो नाशिकला जंगलामध्ये लपून बसला होता अशी माहिती समोर येतेय. दरम्यान, काल रात्री तो डोंबिवलीत परत आला व त्याने आज सकाळी स्वतःच्या छातीवरती स्वतःकडे असलेल्या पिस्तूलातून गोळी झाडून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

पत्नीवर हल्ला करणाऱ्या पतीने स्वतःलाच मारली गोळी; आरोपीने बंदूक आणली कुठून?
Petrol : लवकरच पेट्रोल १२५ पार होणार?

सोमनाथला एम्स (AIMS) हॉस्पिटल मध्ये दाखल केले आहे आणि त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याच रिव्हॉल्वर हे त्याने मध्यप्रदेश म्हणून विकत आणले असल्याचे त्याच्याकडून सांगण्यात आले ते बेकायदेशीर पिस्तूल आहे आणि त्यांनी कोठून आणले कोणाकडून विकत घेतले याचा तपास पोलीस करत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांनी सांगितले.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com