मुंबई : देशात गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमती सातत्याने वाढत आहेत. देशभरात पेट्रोल (Petrol) ११० रुपयांच्या पार गेले असून पेट्रोलचा हा दर मागील तीन महिन्यापासून स्थिर झाला आहे. पेट्रोल-डिझेल दरवाढीचा परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनावर थेटपणे होत असतो. सध्या महागाईने कळस गाठला आहे. पेट्रोलचे दर पुन्हा पूर्ववत होतील का याबद्दल कोणतेही अनुमान बांधता येत नाहीत. (Petrol Prices To Hike Again)
मात्र, पेट्रोलचे दर पुन्हा उसळी घेतील हा अनुमान मात्र सध्याच्या घडीला कोणीही बांधू शकतो. या इंधनाच्या दरांनी सध्या सर्वसामान्य नागरिकांचे जगणे मुश्किल केले आहे. परवडत नसले तरीही सहन करण्यापलीकडे काहीच करता येत नसल्याची भावना सामान्य जनतेत आहे.
हे सर्व सुरु असतानाच पुन्हा एकदा डोक्याला हात लावण्याची वेळ येतेय का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण पेट्रोलचा दर वाढण्याची शक्यता निर्माण झाली असून हा दर १२५ रुपये प्रतिलिटर पर्यंत होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. देशात होत असलेल्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर म्हणजेच १० मार्च नंतर १० ते १२ रुपयांची प्रतिलिटर इतकी वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या कच्या तेलाचे दर ९५ डॉलर प्रति बॅरल इतके वाढले आहेत. मात्र, येत्या काही दिवसांत १०० डॉलर प्रति बॅरल पर्यंत कच्चे तेल आंतरराष्ट्रीय बाजारात महागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.