solapur, pandharpur, ashadhi wari 2023, Pandharpur Wari 2023, Pandharpur Yatra, Ashadi Ekadashi saam tv
महाराष्ट्र

Ashadi Ekadashi 2023 : टाळ मृदुंगाच्या गजरात भाविकांची पंढरपूरात गर्दी वाढू लागली, ऊन वारा पावसापासूनच्या संरक्षणासाठी पत्रा शेडची उभारणी

आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरात भाविकांना जास्ती जास्त चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे.

Siddharth Latkar

- भारत नागणे / सचिन जाधव

Ashadhi Ekadashi : आषाढी वारीसाठी (Ashadhi Wari 2023) सर्वच प्रमुख व मानाच्या पालख्यांनी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले आहे. पंढरपूरात भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. यंदा मंदिर समितीने दर्शन रांगेसाठी गोपाळपूर रोडवरील मैदानावर दहा पत्र शेडची उभारणी केली आहे. (Maharashtra News)

संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे आज (साेमवार) पुण्यात आगमन होणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा मुक्काम श्री पालखी विठ्ठल मंदिर (भवानी पेठ) तर संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा मुक्काम श्री निवडुंगा विठोबा मंदिरात (नाना पेठ) येथे असेल.

दोन्ही मंदिरांमध्ये यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. सायंकाळी मंदिरांमध्ये पालखीचे आगमन झाल्यावर अभिषेक, पादुका पूजन आणि आरतीने पालख्यांचे स्वागत होणार आहे.

त्यानंतर रात्रभर भाविकांना पादुकांचे दर्शन घेता येणार आहे. दोन्ही मंदिरांमध्ये उत्सव मंडपाच्या उभारणीसह विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट करण्यात आली आहे.

आज (साेमवार) सायंकाळी 7 ते 8.30 च्या सुमारास संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala) मुक्कामासाठी श्री पालखी विठ्ठल मंदिर (भवानी पेठ) तसेच संत तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj Palkhi Sohala) यांची पालखी मुक्कामासाठी श्री निवडुंगा विठोबा मंदिरात (नाना पेठ) येणार आहे.

दाेन दिवसांपुर्वी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पंढरपूरातील विठ्ठल रखुमाई मंदिरास भेट दिली. त्यावेळी भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी मंदिर परिसरातील रस्त्यांवर पत्रा शेड उभारली जातील तसेच दर्शन रांगेतील भाविकांना पाणी आणि नाष्टा देण्याची व्यवस्था केली जाईल असे म्हटलं हाेते.

दरम्यान मंदिर समितीने दर्शन रांगेसाठी गोपाळपूर रोडवरील मैदानावर दहा पत्र शेडची उभारणी केली आहे. येथील एका पत्राशेड मध्ये किमान एक हजार ते बाराशे भाविक उभे राहतील अशी व्यवस्था केली आहे. दर्शन रांगेतील भाविकांच्या पायांना खडे टोचू नयेत म्हणून मॅटची व्यवस्था केली आहे. दर्शन रांगेतील भाविकांना विठुरायाचे चोवीतास लाईव्ह दर्शनाचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

याबराेबरच दर्शन रांगेतील भाविकांना पाणी, चहा, नाष्टा याबरोबरच आरोग्याच्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

Edited by : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur-Karjat : बदलापूर-कर्जतसाठी मोदींनी घेतला मोठा निर्णय, लोकल प्रवास होणार सुसाट, मुंबई-पुणेकरांसाठीही फायदा

Maharashtra Live News Update : पुण्यात दिवसा ऊबदार वातावरण, पहाटे कडाक्याची थंडी

Shani Gochar 2026: 2026 साली या राशींचं भाग्य उजळणार; नवी नोकरी पैसा मिळून तुम्ही होणार करोडपती

Gold Rate Prediction: सोन्यात आता ५ लाख गुंतवले तर २०३० मध्ये किती रिटर्न मिळणार? वाचा कॅल्क्युलेशन

Sangli Politics : सांगलीत प्रचारादरम्यान हायव्होल्टेज ड्रामा, दोन गट आपापसात भिडले; राष्ट्रवादीच्या नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT