सातबाऱ्यावर निसप्र शेरा रद्द करण्यासाठी तहसीलदाराने मागितली पंधरा हजाराची लाच... राजेश भोस्तेकर
महाराष्ट्र

सातबाऱ्यावर निसप्र शेरा रद्द करण्यासाठी तहसीलदाराने मागितली पंधरा हजाराची लाच...

पुढील कारवाई लाच लुचपत विभागामार्फत सुरू

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राजेश भोस्तेकर

रायगड - कुळ कायद्याप्रमाणे सातबाऱ्यावर निसप्र शेरा रद्द करून भोगवटा २ चा भोगवटा १ अशी नोंद करण्याकरिता मागितलेल्या पंधरा हजाराच्या लाचेप्रकरणी bribe मुरुड तहसीलदार Murud Tehsildar गमन गावितसह (५३), शिपाई संदेश वाळंज (५२), रेमनाथ पाटील (४७) असे तिघांना नवी मुंबई Navi Mumbai लाच लुचपत विभागाने रंगेहाथ पकडले आहे. याबाबत पुढील कारवाई लाच लुचपत विभागामार्फत सुरू आहे. मुरुड तालुक्याचे तहसीलदार हेच लाच प्रकरणात अटक झाल्याने तहसील कार्यलयाचा भ्रष्टाचार Corruption चव्हाट्यावर आला आहे.

तक्रारदार याच्या मित्राची मुरुड येथे जागा आहे. या जागेबाबत तक्रारदार यांना त्याच्या मित्राने प्राधिकार पत्र दिले असून कुळाच्या सातबाऱ्यावर तशी नोंद आहे. कुळ कायद्या प्रमाणे ७/१२ उताऱ्यातील निप्रस शेरा रद्द करणेकरिता तसेच भोगवटा २ चा भोगवटा १ अशी नोंद करण्याकरिता प्रकरण तहसील कार्यालय, मुरुड जंजिरा येथील तहसील कार्यालयात तक्रारदार यांनी जमा केले होते.

हे देखील पहा -

निप्रस शेरा रद्द करण्याचे अधिकार तहसीलदार यांना आहेत. हा शेरा रद्द करण्यासाठी आणि भोगवटा बदल करण्यासाठी तहसीलदार गमन गावित याच्या सांगण्यावरून पंधरा हजाराची लाच महसूल शाखेचे शिपाई संदेश वाळंज यांनी मागितली.

याबाबत तक्रारदार यांनी नवी मुंबई लाच लुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पथकाने मुरुड तहसील कार्यालयात सापळा रचला. तहसीलदार याच्या सांगण्यावरून शिपाई संदेश वाळंज याने लाचेची मागणी तक्रारदार याच्याकडे केली होती.

तर तहसीलदार याचे शिपाई रेमनाथ पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडून पंधरा हजाराची लाच पंचासमक्ष स्वीकारली. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या लाच लुचपत पथकाने रंगेहाथ पकडले. या कारवाईत तहसीलदार आणि दोन शिपाई याना अटक करण्यात आली आहे.तहसीलदारच लाचे प्रकरणी अटक झाल्याने मुरुड तालुक्यात चर्चेचा विषय रंगला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena Live Update : विधीमंडळातील फुटीचे पडसाद मूळ पक्षात का उमटू शकत नाहीत?; न्यायमूर्ती बागचींच्या प्रश्नाने कोर्टात पुन्हा वाद पेटला

Maharashtra News Live Update : घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांचा आकडा ७ वर पोहचला

Weight Loss: ट्रेडमिल की बाहेर चालणे? वजन कमी करण्यासाठी जाणून घ्या कोणता पर्याय ठरेल अधिक फायदेशीर

Beauty Tips : मानेवर चामखीळ किंवा तीळ घाण दिसतोय? या घरगुती उपायांनी करा कायमचा उपाय

Janhvi Kapoor: अश्लील फोटोप्रकरणी जान्हवी कपूरला हाय कोर्टाचा दिलासा; पण, फॅन पेजेस ब्लॉक करण्यास नकार

SCROLL FOR NEXT