बंगळुरू : कोरोना Corona संसर्गाची दुसरी लाट काहीशी आटोक्यात आल्यासारखे चित्र पाहत असले, तरी तिसरी लाट ही येण्याचा धोका अनेक तज्ज्ञांनी वर्तवली आहे. तसेच, तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सर्वात जास्त धोका असल्याचे इशारा देखील दिले गेले आहे. काही दिवस वारंवार सूचना दिले जात आहे. हा इशारा खरा ठरू लागल्याचे संकेत म्हणता येणार आहे.
ही अशी स्थिती कर्नाटक Karnataka मधील बेंगळुरू Bangalore शहरात मागील ५ दिवस बघायला मिळत आहे. मागील ५ दिवसांत बेंगळुरू मध्ये २४२ मुलांना कोविड- 19ची Covid19 लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच, बेंगळुरूमध्ये १३३८ नव्या कोरोनाबाधितांची आणि ३१ जणांच्या मृत्यूची death नोंद झालेली आहे. यामुळे तिसरी लाट सुरू झालेली दिसून येत आहे. अपेक्षेप्रमाणे मुलांमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढलेले पहायला मिळत असल्याचे तज्ज्ञांचे सांगणे आहे.
हे देखील पहा-
बेंगळुरू महानगरपालिकेकडून Corporation आलेल्या माहितीनुसार, १९ वर्षांखालच्या २४२ जणांचा कोरोना रिपोर्ट मागील ५ दिवसांमध्ये पॉझिटिव्ह Positive आला आहे. त्यामध्ये ९ वर्षांखालच्या १०६ मुलांचा, तर ९ ते १९ वर्षं या वयोगटा मधील १३६ मुलांचा समावेश आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये मुलांमधल्या कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढू शकते, असा इशारा आरोग्य विभागाने Health Department यावेळी दिला आहे. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितलेल्या माहितीनुसार लहान मुलांमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण येणाऱ्या काही दिवसांमध्ये तिप्पट होऊ शकणार आहे.
हे खूप धोकादायक राहणार आहे. मुलांना त्यापासून वाचवण्याकरिता आपण एकच गोष्ट करू शकणार आहेत, ती म्हणजे त्यांना घरातच ठेवणे. मुलांच्या शरीरामधील प्रतिकारशक्ती मोठ्यां माणसासारखी नसते. यामुळे पालकांना कळकळीचे आवाहन आहे, की त्यांनी त्यांच्या मुलांना घराबाहेर पडू देता कामा नये. तसेच, कोरोनाच्या अनुषंगाने सर्व नियमांचे पालन केले जावे.
कर्नाटक सरकारने रात्रीची संचारबंदी Night Curfew, तसेच शनिवार- रविवारच्या संचारबंदीचे आदेश या अगोदरच लागू करण्यात आले आहेत. केरळ मधून, तसेच महाराष्ट्र मधून कर्नाटकात येणाऱ्या प्रवशांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. आधीच्या ७२ तासांमध्ये केलेल्या आरटी- पीसीआर RTPCR चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह असेल, तर अशा व्यक्तींना राज्यात प्रवेश दिला जाणार आहे.
काही सूत्रांकडून आलेल्या माहितीनुसार, १६ ऑगस्टपासून राज्यात अंशतः लॉकडाउन लागू केले जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कर्नाटक राज्या मध्ये मागील महिन्याभरात रोज सुमारे १५०० कोरोनाबाधितांची भर पडताना दिसत आहे. कर्नाटक मध्ये सध्या महिन्याला लशीचे ६५ लाख डोसेस दिले जात आहे. हे प्रमाण अधिक वाढवून १ कोटीपर्यंत नेणार असल्याचे कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई CM Basavraj Bommai यांनी यावेळी दिली आहे.
Edited By- digambar jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.