अनलॉक झालं, उद्यापासून शाळा सुरू पण चिमुकले अद्यापही घरातच बंदिस्त

School starts from tomorrow but children is still locked at home
School starts from tomorrow but children is still locked at home
Published On

लातूर : कोरोनाचा Corona कहर काही प्रमाणात कमी झाला आहे. राज्य शासनाने State Government अनलॉक करून सर्व काही खुल केलं. उद्या शाळा सुरू होत आहेत. आगामी काही दिवसात कोरोनाची तिसरी लाट Third Wave ही बालकांसाठी धोकादायक ठरू शकत असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत न येण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी घरातच ऑनलाईन शिक्षणासाठी बंदिस्त होत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचं बालपण यावर्षीच्या सुरुवातीला देखील घरातच कोमेजून जाणार आहे. School starts from tomorrow but children is still locked at home

उद्या राज्यातील सर्व शाळा सुरू होणार पण दरवर्षी सारखी शाळेची घंटी वाजणार नाही. विद्यार्थ्यांना नवीन गणवेश, स्कुल बॅग, वह्या पुस्तकं सर्व काही मिळणार नाही. शाळेच्या पहिल्या दिवशी गजबजणारे व्हरांडे वर्गखोल्या सुन्या सुन्या राहणार आहेत. बालकांचा किलबिलाट ऐकू येणार नाही. कारण आगामी काळात कोरोनाचा कहर होऊ शकतो असे तज्ञाच मत आहे.

शाळेत केवळ १००% शिक्षकांनी हजर राहत ऑनलाईन क्लास घेण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. यामुळे पालक देखील मुलांना नवीन गणवेश, नवीन दप्तर खरेदीसाठी मुलांना बाजारात घेऊनच गेले नाहीत. लहान बालकांसाठी शाळेचा पहिला दिवस हा अतिआनंदाचा, नवीन मित्र मैत्रिणींचा, नवीन वर्गाचा, नवीन शिक्षकांचा. पण याच बालकांच्या शाळेची सुरुवात ही घरातच होणार असल्याने बालपण कोमेजून जात आहे. 

हे देखील पहा- 

मुले देखील शाळा सुरू करण्याची विनंती करत आहेत. पण कोरोनाची भीती आता शालेय मुला-मुलींच्या मानगुटीवर येऊन बसली आहे. आता शाळा केव्हा सुरू होणार याच आशाळभूत नजरेने लेकरं वाट पाहत आहेत.  

Edited By- Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com