Chandrapur Teak Wood For PM Office:  Saamtv
महाराष्ट्र

Chandrapur Teak Wood: दिल्लीचे 'तख्त' महाराष्ट्र बनवणार! चंद्रपूरचे सागवान वाढविणार पंतप्रधानांच्या खुर्चीची शोभा; काय आहे खासियत?

Chandrapur Teak Wood For PM Office: देशाच्या पंतप्रधानांची खुर्चीही चंद्रपूरमधील सागवानाच्या लाकडांपासून बनणार आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

Gangappa Pujari

गणेश कवाडे| चंद्रपूर, ता. ६ सप्टेंबर २०२४

Chandrapur Teak Wood For PM Chair: अयोध्येमधील प्रभू श्रीराम मंदिर, दिल्लीमधील नवी संसद भवनाच्या निर्मितीमध्ये महाराष्ट्राने मोलाचा वाटा उचलला होता. राममंदिर आणि संसदेमधील कामासाठी महाराष्ट्रातून लाकूड पुरवण्यात आले होते. त्यानंतर आता महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार असून देशाच्या पंतप्रधानांची खुर्चीही चंद्रपूरमधील सागवानाच्या लाकडांपासून बनणार आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

दिल्लीचे तख्त महाराष्ट्र बनवणार...

याबाबत सविस्तर माहिती अशी की, देशाच्या पंतप्रधानांच्या खुर्चीसह पंतप्रधान कार्यालयातील कामासाठी चंद्रपूरमधील सागवान लाकूड वापरण्यात येणार आहे. या कामासाठी तब्बल ३ हजार घन फूट सागवान चंद्रपुरातून दिल्लीला रवाना होणार आहे. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबतची माहिती दिली आहे. येत्या ८ सप्टेंबरपासून सागवान दिल्लीला पाठवण्यास सुरुवात होणार आहे.

चंद्रपुरमधील सागवान जाणार दिल्लीला

पंतप्रधानांच्या खुर्चीसह पंतप्रधान कार्यालय, केंद्रीय मंत्रीमंडळ सभागृह, केंद्रीय मुख्य सचिवांचे दालन तयार करण्यासाठी हे सागवान वापरण्यात येणार आहे. देशात सर्वोत्तम सागवान चंद्रपुरात असल्याने येथील लाकडापासून दिल्ली कार्यालय तयार करण्याचा निर्णय केंद्रीय समितीने घेतला आहे. त्यामुळे राम मंदिर, संसद भवन नंतर पंतप्रधानांच्या खुर्चीच्या रुपात महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे.

महाराष्ट्रातील सागवानाला मागणी का?

विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली या भागात मोठ्या प्रमाणावर सागवानाचे जंगल आहे. तसेच चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात आढळणारे गोलाकार लाकूड आणि चिरण सागवान मजबूत आणि सर्वोत्तम लाकूड मानले जाते. त्याशिवाय ते प्रदीर्घ काळ टिकते. त्यामुळे त्याला देशभरातून मोठी मागणी आहे. याआधी राममंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासह इतर कामे याच लाकडाने केली होती. राम मंदिराच्या निर्मितीवेळी १८०० क्युबीक मीटर लाकूड अयोध्येला नेण्यात आले होते. तसेच नव्या संसद भवनाच्या निर्मितीवेळीही या लाकडाचा वापर करण्यात आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जळगावच्या सराफ बाजारात चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी मोठी वाढ

Namo Shetkari Yojana: नमो शेतकरी योजनेतून ६ लाख शेतकऱ्यांना वगळले? तुम्हाला ₹२००० मिळणार की नाही? असं करा चेक

Lagnanantar Hoilach Prem Video : जीवा-नंदिनी अन् पार्थ-काव्याचा संसार मोडला? 'लग्नानंतर होईलच प्रेम' मध्ये मोठा ट्विस्ट

मोठी बातमी! काँग्रेस नेत्या प्रज्ञा सातव यांचा आमदारकीचा राजीनामा; भाजपमध्ये आज प्रवेश करणार

Gharkul Yojana : मावळात कातकरी-ठाकर समाजाला मिळणार हक्काचे घर, सरकार थेट कॉलनी उभारणार

SCROLL FOR NEXT