Maharashtra Politics: एकनाथ शिंदे से बैर नहीं, देवेंद्र तेरी खैर नहीं, फडणवीसांना कुणी दिला इशारा?

Supriya Sule on Devendra Fadnavis : महाविकास आघाडीतील नेत्यांच्या रडारवर प्रामुख्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याचं दिसून येतंय.
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे से बैर नहीं, देवेंद्र तेरी खैर नहीं, फडणवीसांना कुणी दिला इशारा?
Eknath Shinde Latest News, Devendra Fadnavis Latest News, saam tv
Published On

Maharashtra Political Update: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता राज्यात विधानसभेचे वारे वाहू लागले आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमधील घटकपक्षांकडून सध्या वेगवेगळ्या मतदारसंघांचा आढावा घेतला जात आहे. यादरम्यान दोन्ही बाजूंनी एकमेकांवर टीकेचा भडिमार देखील केला जातोय. महाविकास आघाडीतील नेत्यांच्या रडारवर प्रामुख्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याचं दिसून येतंय.

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे से बैर नहीं, देवेंद्र तेरी खैर नहीं, फडणवीसांना कुणी दिला इशारा?
Pune Crime News : वनराज आंदेकर यांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; अखेर पोलिसांनी शोधून काढलं खुनाचं खरं कारण

काही दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख (ठाकरे गट) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देवेंद्र फडणवीसांना खुलं आव्हान दिलं होतं. एकतर तू राहशील नाहीतर मी राहील, अशा शब्दात ठाकरेंनी फडणवीसांवर टीका केली होती. या टीकेची संपूर्ण महाराष्ट्रात चांगलीच चर्चा झाली. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने देखील देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करण्याचं ठरवलंय.

नुकतीच मुंबईत शरद पवार (Sharad Pawar) गटाच्या प्रवक्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीत पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी प्रवक्त्यांना संबोधित केलं. त्याचबरोबर त्यांनी काही मार्गदर्शक सूचना देखील दिल्या. आगामी विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करा, असं सुप्रिया सुळे यांनी प्रवक्त्यांना सांगितल्याची माहिती साम टीव्हीला सूत्रांनी दिली.

"एकनाथ शिंदे से बैर नही, पर देवेंद्र तेरी खैर नहीं" असा नाराच खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रवक्त्यांच्या बैठकीत दिल्याचं सूत्रांनी सांगितलंय. आगामी निवडणुकीत आपलं टार्गेट फक्त देवेंद्र फडणवीस असतील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आपण टीका करायची नाही. महायुतीला जर धारेवर धरायचं असल्यास टीका करताना फक्त देवेंद्र यांच्यावर टीका करायची, असं त्यांनी म्हटलं आहे.

त्याचबरोबर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर कुणीही टीका करणार नाहीत. तसेच मराठा आरक्षणाला आपला पाठिंबा असेल. आपण सर्व नेहमीच आरक्षणाच्या बाजूला आहोत, असंही सुप्रिया सुळे यांनी बैठकीत सांगितलंय. तर अजित पवार यांच्याविषयी कोणीही सहानुभूती दाखवणार नाही, त्यांच्याविरोधातही आक्रमक व्हायचं अशा सूचना देखील सुप्रिया सुळे यांनी प्रवक्त्यांना दिल्याची माहिती आहे.

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे से बैर नहीं, देवेंद्र तेरी खैर नहीं, फडणवीसांना कुणी दिला इशारा?
Heavy Rain Alert : महाराष्ट्रातील 13 जिल्ह्यांना आज पावसाचा अलर्ट; मराठवाडा-विदर्भात कसं असेल हवामान? वाचा...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com