Palghar Saam tv
महाराष्ट्र

Palghar: दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देताना शिक्षकाला रडू आलं, अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू

Lalbahadur Shastri High School: मनोरच्या लाल बहादुर शास्त्री हायस्कूलमध्ये दहावीच्या निरोप समारंभादरम्यान ज्येष्ठ शिक्षक संजय लोहार यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मनोरमधील लाल बहादुर शास्त्री हायस्कूलमध्ये दहावीच्या निरोप समारंभादरम्यान एका दुर्दैवी घटनेने सगळ्यांना हादरवून टाकले आहे. या शाळेतील ज्येष्ठ शिक्षक संजय लोहार यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात सुरू होता. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आणि शाळेतील आठवणींना उजाळा देताना त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. मात्र, भाषण संपल्यानंतर प्रतिज्ञा घेताना अचानक लोहार यांना हृदयविकाराचा झटका आला. काही क्षणांतच ते जमिनीवर कोसळले, ज्यामुळे समारंभातील वातावरण गडद झाले.

शाळेतील अन्य शिक्षक व कर्मचाऱ्यांनी तातडीने लोहार यांना रुग्णालयात नेले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे घोषित केले. ही बातमी ऐकून विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. संजय लोहार हे शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय शिक्षक होते. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यांचे निधन म्हणजे शाळेसाठी मोठी हानी आहे.

या दुर्दैवी घटनेने शाळेसह संपूर्ण मनोर परिसरात दुःखाची लाट उसळली आहे. विद्यार्थ्यांनी आणि सहकाऱ्यांनी लोहार यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची आठवण सदैव जपली जाईल, असे शाळेच्या मुख्याध्यापकांनी नमूद केले. संजय लोहार यांचा अकाली मृत्यू सर्वांसाठी धक्का आहे. या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रातील शिक्षकांच्या कामाच्या ताणतणावांबाबत पुन्हा चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बार्शी तालुक्यात एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

Diljit Dosanjh: एमी अवॉर्ड्स 2025मध्ये दिलजीत दोसांझची एन्ट्री; 'अमर सिंग चमकीला'साठी मिळालं सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचं नामांकन

Uber Driver Viral Video : 'मी पोलिसांना घाबरत नाही जा...', आधी महिला प्रवाशांना शिवीगाळ, नंतर मारण्यासाठी धावला; उबर चालकाचा VIDEO व्हायरल

ESIC Recruitment: सरकारी नोकरीची संधी; ESIC मध्ये भरती सुरु; पगार मिळणार १,०६,००० रुपये; अर्ज कसा करावा?

Buldhana : अतिवृष्टीमुळे शेती गेली खरडून; कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा कसा, शेतकऱ्याचा सरकारला प्रश्न

SCROLL FOR NEXT