ncp  Saam tv
महाराष्ट्र

'NCP विलिनीकरणाविरोधात कट कारस्थान?' वडेट्टीवारांच्या दाव्यानं राज्यात खळबळ

ncp politics : अजितदादांच्या अपघातानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चांनी चांगलाच जोर धरलाय... अशातच दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाविरोधात कट-कारस्थान केला गेल्याचा दावा विरोधकांनी केलाय.. त्यामुळे हे कट-कारस्थान कोणी केलं? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Bharat Mohalkar

अजित पवारांच्या मृत्यूवरुन संशयाचं धुकं निर्माण झालं असतानाच आता दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होऊ नये म्हणून कट शिजला आणि त्यातूनच ठिणगी पडल्याचा खळबळजनक दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी केलाय.. तर अशा आरोपांआधी वडेट्टीवारांनी चंद्रपूरमध्ये काँग्रेसचा महापौर निवडून आणावा, असा टोला तटकरेंनी लगावलाय..

खरंतर दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण ही अजित पवारांची इच्छा होती... असा दावाच शरद पवारांनी केला होता... त्यानंतर विलिनीकरणावरुन आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडायला सुरुवात झालीय... दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अडचण निर्माण होण्याची शक्यता असलेल्या जितेंद्र आव्हाड, माजी आमदार अशोक पवार, प्राजक्त तनपुरे आणि हर्षवर्धन पाटील या नेत्यांची जयंत पाटलांच्या घरी गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर आलीय... या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली...पाहूयात...

- बैठकीतील नेत्यांची अजित पवारांशी वन-टू-वन चर्चा

- जितेंद्र आव्हाडांच्या मतदारसंघावर सविस्तर चर्चा

- अशोक पवारांच्या घोडगंगा कारखान्याला मदतीचं आश्वासन

- प्राजक्त तनपुरेंच्या पोटनिवडणुकीसाठी विशेष रणनीती

- हर्षवर्धन पाटलांच्या मुलीला घड्याळावर उमेदवारी देण्याची चर्चा

- दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटलांच्या संघर्ष मिटवण्यावर भर देण्यात आलाय..

ही माहिती समोर आल्यानंतर दादांच्या राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांनीही विलिनीकरणाच्या चर्चा सुरु असल्याची अप्रत्यक्षपणे कबुलीच दिलीय.. तर विलिनीकरणाची चर्चेत 2 हजार टक्के सत्यता असल्याचा दावा आव्हाडांनी दिलाय...

एवढंच नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विलिनीकरणाबाबत अजितदादांनी आमच्याशी चर्चा केली नसल्याचं म्हटलंय..त्यावर 'विलिनीकरणाच्या चर्चेत नसणाऱ्यांना बैठकीबाबत काय माहिती असणार?, असा टोला पवारांनी अनौपचारिक बैठकीत लगावलाय...

दादांच्या मृत्यूनंतर विलिनीकरणाबाबत दररोज नवनवी माहिती समोर येत असल्यानं विलिनीकरणाच्या चर्चांना पुष्टी मिळतेय.. मात्र आपलं राजकीय करियर दाव्यावर लागण्याच्या भीतीने काहींच्या विलिनीकरण रोखण्याच्या हालचाली सुरु आहेत का? असा प्रश्नही यामुळे उपस्थित होतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कोपरगावमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की

Jio Recharge: लाखो युजर्ससाठी खुशखबर! डेटा, कॉलिंग अन् बरंच काही...; Jioचा सर्वात भन्नाट रिचार्ज प्लान, किंम्मत किती?

Raqesh Bapat: आधी लग्न मोडलं मग ब्रेकअप; बिग बॉस फेम राकेश बापटच्या लव्हलाईफमध्ये मोठा गोंधळ

अशोक खरातचे डर्टी चॅट्स अन् नको ते व्हिडिओ आले समोर; पोलिसांनी रिकव्हर केला मोबाईल डेटा, मोठा भांडाफोड होणार

सुनेत्रा पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या ३५ पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे

SCROLL FOR NEXT