

विमान अपघाताचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय...अजितदादांच्या विमान अपघाताचा हा व्हिडिओ असल्याचा दावा करण्यात आलाय...या व्हिडिओत पाहा, विमानाचं नियंत्रण सुटलं आणि 2 ते 3 वेळा गटांगळ्या घालताना विमान दिसतंय...त्यानंतर हे विमान कोसळलं आणि मोठा स्फोट झाल्याचं या व्हिडिओत दिसतंय...पण, खरंच हा अजितदादांच्या विमान अपघाताचा व्हिडिओ आहे का...?
अजित पवारांच्या विमानाचा अपघात 28 जानेवारीला झाला आणि वेगवेगळे सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलेयत...यात काही स्थानिकांनीही व्हिडिओ बनवले होते तेही समोर आले...पण, हा व्हिडिओ दादांच्या विमानाचा आहे का...? एवढा जवळून हा व्हिडिओ कुणी बनवला...? याची आम्ही पडताळणी सुरू केली...दादांचं विमान आणि या विमानाचा व्हिडिओ नीट पाहिला...त्यावेळी दोन्ही विमानांमध्ये साधर्म्य आढळलं.
व्हिडिओत दिसणारं विमान छोटं दिसतंय...आणि अजितदादांचं विमान हे थोडं वेगळं दिसतंय...त्यामुळे आम्ही हा व्हिडिओ आहे याचा शोध घेतला...त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात...
व्हायरल सत्य काय?
साम इन्व्हिस्टिगेशन?
व्हायरल व्हिडिओ अजितदादांच्या अपघाताचा नाही
व्हिडिओ व्हेनेझुएलातील असल्याची माहिती
23 ऑक्टोबर 2025 मध्ये विमान कोसळलं होतं
प्वेर्टो काबेलोतील खाजगी विमान अपघाताचा व्हिडिओ
अजितदादांच्या विमान अपघाताचा व्हिडिओ म्हणून हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आलाय...मात्र, आमच्या पडताळणीत हा व्हिडिओ अजितदादांच्या विमानाचा असल्याचा दावा असत्य ठरलाय...अपघातामुळे कोणीही असे व्हिडिओ व्हायरल करून दिशाभूल करतायत...त्यामुळे अशा व्हिडिओवर विश्वास ठेवू नका.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.