चौफेर टीकेनंतर डाव फिरवला; काँग्रेस-भाजप आघाडीची नोंदणी रद्द, मालेगावात नेमकं काय घडलं?

Malegaon politics : चौफेर टीकेनंतर मालेगावत डाव फिरवला आहे. काँग्रेस-भाजपने गट नोंदणी रद्द केली आहे.
Malegaon news
Malegaon political News Saam tv
Published On
Summary

मालेगाव महापालिकेत काँग्रेस–भाजप गट रद्द करण्यात आलाय

भाजपच्या दोन नगरसेवकांनी माघार घेतली

मालेगावातील भारत विकास आघाडीची गट नोंदणी रद्द केलीये

मालेगाव महापालिकेत मोठा राजकीय ट्विस्ट निर्माण झाला आहे. या महापालिकेत भाजपने अचानक माघार घेतली आहे. भाजपच्या दोन्ही नगरसेवकांनी काँग्रेससोबतचा गट रद्द केलाय. विभागीय आयुक्त कार्यालयातील गट नोंदणी अर्ज रद्द करण्यात आला आहे. गट रद्द करण्यासाठी अधिकृत अर्ज दाखल करण्यात आला आहे. काँग्रेस–भाजप एकत्र आल्याने जिल्हा आणि राज्यभरात मोठी चर्चा झाली होती.

Malegaon news
कमळ-धनुष्यबाणालाचा निधी मिळणार; मंत्री नितेश राणे यांचे वादग्रस्त वक्तव्य, VIDEO

मालेगावात कट्टर विरोधक एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात होते. काँग्रेससोबत भाजपच्या दोन्ही नगरसेवकांनी ‘भारत विकास आघाडी’ गट स्थापन केला होता. भाजपच्या निर्णय बदलल्याने मालेगावच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

Malegaon news
कुणाला नकोय राष्ट्रवादीचं विलिनीकरण? अजितदादांच्या मृत्यूनंतर विलिनीकरणाच्या चर्चेला जोर

मालेगावच्या राजकारणाची सर्वत्र चर्चा

मालेगाव महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडीसाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. या महापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपच्या नगरसेवकांनी हात मिळवणी केली होती. मालेगावातील 'इस्लाम' पक्षाला रोखण्यासाठी दोन्ही कट्टर विरोधक एकत्र आले होते. मालेगावत भाजपचे दोन तर काँग्रेसचे तीन उमेदवार जिंकले आहेत. भाजप आणि काँग्रेसने मिळून भारत विकास आघाडीची स्थापना केली होती.

Malegaon news
Tuesday Horoscope : आनंदाला सीमा राहणार नाही; ५ राशींच्या लोकांच्या नशिबात चमत्कार घडणार

मालेगाव महापालिकेत एकूण ८४ सदस्य संख्या आहे. परंतु कोणत्याही पक्षाने बहुमत मिळवलेलं नाही. मालेगावात इस्लाम पक्षाचे ३५ नगरसेवक निवडून आले आहेत. भाजप आणि काँग्रेसचे एकूण ५ नगरसेवक होते. दोन्ही पक्षाची मालेगावात महत्वाची भूमिका राहणार आहे. महाराष्ट्रात मुस्लिमांची संख्या १२ टक्के इतकी आहे. तर मालेगावात ७८ टक्के मुस्लिम आहेत. भारतात मुस्लिम समुदायांचा कल काँग्रेसकडे अधिक झुकतो. परंतु मालेगावात चित्र बदलले दिसून आले. मालेगावात 'इस्लाम' पक्ष गेमचेंजर ठरला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com