Raju Shetti, Ravikant Tupkar, Swabhimani Shetkari Sanghatana saam tv
महाराष्ट्र

Loksabha Election 2024: रविकांत तुपकरांनी लोकसभेसाठी शड्डू ठोकला, राजू शेट्टींकडून 'स्वाभिमानी'च्या सहा जागा जाहीर

रविकांत तुपकर यांनी संघटनेच्या माध्यमातून लोकसभेची निवडणूक लढवावी असेही राजू शेट्टींनी नमूद केले.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur News :

आम्ही दोन वर्षांपूर्वीच महाविकास सरकार सोबतचे संबंध तोडले आहेत. आघाडी सरकारमधून बाहेर पडलो, तिथून पुढे निवडणुका स्वबळावर लढवायच्या असा निर्धार आम्ही केला आहे. आगामी काळातील लाेकसभा निवडणुकीत (lok sabha election) महाराष्ट्रातील सहा जागांवर स्वाभिमानीचे उमेदवार निवडणुक लढवतील असे निश्चित केल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (raju shetti) यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रविकांत तुपकर यांनी आज साम टीव्हीशी बाेलताना शेतकऱ्यांचा आणि तरुणांचा लोकसभा निवडणूक लढून दिल्लीला जावे असा दबाव असल्याचे सांगितले. यावर साम टीव्हीने आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचे मत जाणून घेतले.

राजू शेट्टी म्हणाले स्वाभिमानीने यंदा सहा जागांवर लोकसभा निवडणुक लढविण्याचा निर्धार केला आहे. त्यापैकी एक बुलढाणा आहे. रविकांत तुपकर यांनी संघटनेच्या माध्यमातून लोकसभेची निवडणूक लढवावी असेही शेट्टींनी नमूद केले.

ते म्हणाले अलीकडे ते संघटनेच्या कार्यक्रमाला येत नाहीत. त्यांनी जर संघटनेकडून निवडणूक लढवली तर आम्हांला आनंदच आहे असेही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले. (Maharashtra News)

दरम्यान स्वाभिमानी यंदा बुलढाणा, हातकणंगले, परभणी, काेल्हापूर, सांगली, माढा या मतदारसंघात लाेकसभेसाठी उमेदवार उभे करेल. या जागांवर निवडणूक लढविण्याचे नियाेजन यापूर्वीच ठरले आहे असेही राजू शेट्टींनी सांगितले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shubman Gill : गिल दा मामला...! मँचेस्टर कसोटीत शुभमन गिलचे शतक, कॅप्टनने अनेक रेकॉर्ड मोडले

Gold Price: सोन्याची उसळी! सोन्याचा दर लवकरच 1 लाख 10 हजारांवर जाणार

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT