Parbhani News, Swabhimani Shetkari Sanghatana  saam tv
महाराष्ट्र

Parbhani News : पोलिसांच्या कार्यपद्धतीवर 'स्वाभिमानी' नाराज, परभणीत छेडले रास्ता राेकाे आंदाेलन

आज पाेळा सण असल्याने शेतकरी खरेदीसाठी परभणीत आले हाेते.

राजेश काटकर

Swabhimani Shetkari Sanghatana News : परभणी शहर वाहतूक शाखेचे कामकाज अयाेग्य पद्धतीचे असल्याचा आराेप करत आज (गुरुवार) स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रास्ता राेकाे आंदाेलन छेडले. यावेळी आंदाेलकांनी पाेलिसांच्या कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली. (Maharashtra News)

परभणी गंगाखेड मार्गावर खेड्यापाड्यात जाणाऱ्या ऑटो, जीप चालत असतात. आज पोळा असल्याने गावकरी, शेतकरी खरेदीसाठी परभणी शहरात आले होते. पोलिसांनी या गाड्या थांबवून वसुली मोहिम सुरू केली.

त्यामुळे काही गावकरी रस्त्यावर अडकून पडले होते. ही घटना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्याला कळल्यावर गावकऱ्यांसह त्यांनी रास्ता रोको आंदोलन छेडले. यावेळी काही काळ वाहतुकीची व्यवस्था विस्कळीत झाल्याचे पहायला मिळाले.

दरम्यान पाेलिसांनी नियमांचे पालन करणा-यांना नाहक त्रास देऊ नये अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदाेलन छेडेल असा इशारा आंदाेलकांनी दिला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Satara Politics: साताऱ्यात मोठी राजकीय घडामोड, बड्या नेत्यांसह कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

Mumbai Tourism: वीकेंड ट्रिप प्लॅन करताय? मुंबईतील 'हे' किल्ले आहेत ट्रॅव्हल लव्हर्ससाठी परफेक्ट डेस्टिनेशन

Maharashtra Live News Update: डबल स्टार असलेल्या मतदारांना मतदान करता येणार नाही- निवडणूक आयोग

Wednesday Horoscope: त्रिपुरी पौर्णिमा; ५ राशींच्या पैशांच्या समस्या होणार दूर, बढतीचेही योग, वाचा राशीभविष्य

Aditi Rao Hydari: अदिती राव हैदरीचा ‘ऑल-ब्लॅक’ रॉयल लूक व्हायरल, पाहा खास फोटो

SCROLL FOR NEXT