Nanded ST Bus News : नांदेड जिल्हाअंतर्गत बस सेवा अचानक बंद, प्रवाशांची गैरसाेय

रात्री मुक्कामी आल्या होत्या तेवढ्याच गाड्या आज सकाळी सोडण्यात आल्या.
nanded news
nanded newssaam tv

- संजय सूर्यवंशी

Nanded News : नांदेड जिल्हयात गेल्या दोन दिवसात राज्य परिवहन महामंडळाच्या बसचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले. परिणामी एसटी महामंडळाचा आर्थिक ताेटा माेठ्या प्रमाणात झाला. आज एसटी बसची सुरक्षितता म्हणून नांदेड जिल्हा अंतर्गत बस सेवा बंद (msrtc bus service bus closed in nanded today) ठेवण्यात आली आहे. (Maharashtra News)

nanded news
Aanna Hazare News : केवळ सरकारच नव्हे विराेधकांनी देखील 'याचा' विचार करावा : अण्णा हजारे

नांदेड जिल्हयात गेल्या दोन दिवसांत एक एसटी महामंडळाची बस जाळण्यात आली. अन्य एका एसटी बस वर दगडफेक करण्यात आली. यामुळे दोन दिवसांत दोन एसटी बसचे माेठे नुकसान झाले.

nanded news
Pune Bangalore National Highway Accident News : पुणे- बंगळुरू महामार्गावर भीषण अपघात, तीन ठार

अचानक सेवा बंद

एसटी बसचे आणखी माेठे नुकसान हाेऊ नाही यासाठी आज (गुरुवार) नांदेड जिल्ह्यात जिल्हा अंतर्गत एसटी बस सेवा सकाळ पासुन बंद ठेवण्यात आली आहे. अन्य आगारातून आणि विभागातून ज्या गाड्या रात्री मुक्कामी आल्या होत्या त्या गाड्या सकाळी सोडण्यात आल्या.

प्रवाशांची गैरसाेय

नांदेड आगार आणि जिल्ह्यातील अन्य आगारातून एसटी बसेस अद्यापही सोडण्यात आलेल्या नाहीत. दरम्यान अचानक बस बंद ठेवण्याचा निर्णय एसटी महामंडळाकडून घेण्यात आल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com