swabhimani shetkari sanghatana, prashant dikkar saam tv
महाराष्ट्र

Swabhimani Shetkari Sanghatana: पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 'स्वाभिमानी' च्या अन्नत्याग आंदोलनाचा दिवस चाैथा... प्रशांत डिक्कर यांची प्रकृती खालवली

Prashant Dikkar News : जळगाव जामोद एसडीओ कार्यालयासमोर सुरू असलेल्या या अन्नत्याग आंदोलनाला सर्व स्तरावरून पाठिंबा मिळत आहे.

संजय जाधव

Buldhana News : शेतक-यांच्या विविध मागण्यांसाठी लढणा-या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बुलढाणा जिल्ह्यात अन्नत्याग आंदाेलन सुरु केले आहे. या आंदाेलनाच्या तिस-या दिवशी संघटनेचे संघटक प्रशांत डिक्कर यांची प्रकृती खालावल्याची चर्चा आहे. वैद्यकीय अधिकारी त्यांच्या प्रकृतीची तपासणी राेजच्या राेज करीत आहेत.(Maharashtra News)

जळगावजामोद संग्रामपूर तालुक्यातील पूरग्रस्तांच्या आपबीतीवर लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाची तिसऱ्या दिवशीही प्रशासनाने दखल न घेतल्याने शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत. आज या आंदाेलनाचा चाैथा दिवस उजाडला आहे.

जळगावजामोद येथील उपविभागीय अधिकारी कार्याल्यासमोर हे आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान आंदाेलनकर्ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांची प्रकृती खालावल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीची मदत अद्याप पर्यंत नुकसानग्रस्तांना (farmers) मिळाली नाही, हजारो लोक बेघर आहेत, अनेकांचे संसार उध्वस्त झालेले आहे, हजारो शेतकऱ्याच्या शेत जमिनी खर्डून गेलेल्या आहेत. शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

अद्याप सरकारने कुठलीही आर्थिक मदत केली नाही. त्यामुळे नुकसानीची तात्काळ भरीव आर्थिक मदत मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर हे आक्रमक झाले आहेत. त्यांच्या आंदाेलनास पाठिंबा मिळू लागला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोकाटे प्रकरणात हायकोर्टात सुनावणीला सुरुवात

Trekking Tips : ट्रेकिंगला जात असाल तर या गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा

Happy Patel: आमिर खानच्या 'हॅपी पटेल'मधून डीके बोसची जोडी येणार प्रेक्षकांच्या भेटीला; इमरान खान करणार कमबॅक? पाहा ट्रेलर

Fitness Mistakes: दररोज १०००० पावलं चालताय, पण रिझल्ट झिरो! संशोधनातून ही ५ कारणं आली समोर

Maharashtra Politics: आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, माजी मुख्यमंत्र्यांचा खळबळजनक दावा|VIDEO

SCROLL FOR NEXT