Shruti Vilas Kadam
सुरुवातीसाठी उत्तम व्यायाम. सांध्यांवर ताण कमी पडतो. दररोज ४५–६० मिनिटं वेगात चालल्यास हळूहळू वजन घटतं.
जॉगिंग केल्याने चालण्यापेक्षा जास्त कॅलरीज बर्न होतात. कमी वेळेत वजन कमी करायचं असल्यास जॉगिंग करावी. मात्र गुडघे/सांधे दु:खीचा त्रास असतील तर काळजी घ्यावी.
पोट, मांड्या आणि कंबर यावर काम करायचे असेल तर बाहेर किंवा स्टॅशनरी सायकल दोन्ही उपयोगी आहे. सायकलिंग हा प्रकार जॉगिंगपेक्षा फायदेशीर आहे.
३० मिनिटांत साधारण चालण्याने 120–150 कॅलरीज, सायकलिंगने 200–250 कॅलरीज आणि जॉगिंगने 250–300 कॅलरीज कमी होतात. त्यामुळे जॉगिंगने वजन लवकर कमी होतं.
जॉगिंग आणि सायकलिंगमुळे हार्ट रेट जास्त वाढतो, त्यामुळे फॅट बर्निंग जलद होते. चालणं दीर्घकाळ केल्यास चांगला परिणाम दिसतो.
सगळ्यांसाठी जॉगिंग योग्यच असेल असं नाही. नियमित करता येईल असा व्यायाम निवडणं जास्त महत्त्वाचं.
झटपट वजन कमी करायचं असेल तर जॉगिंग, सांध्यांची काळजी घ्यायची असेल तर सायकलिंग आणि सुरुवात/दीर्घकाळ सातत्य ठेवायचे असेल तर चालणं असे तिन्ही प्रकार वापरावे.