Latur Krushi Utpanna Bazar Samiti : लातूरचा डाळ उद्याेग आर्थिक संकटात; जाणून घ्या कारण

यंदा पेरणी 20 ते 25 दिवस लांबणीवर गेल्याने या पिकांचा पेरा जिल्ह्यात घटला आहे.
latur apmc market, pulses
latur apmc market, pulsessaam tv

- संदिप भोसले

Latur News : लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीत (Latur Krushi Utpanna Bazar Samiti) तूर, मूग, उडीद यांना मोठा भाव मिळत आहे. लातूर जिल्ह्यात यंदा उत्पादनात घट झाल्याने बाजारात आवक घटली. यामुळे आगामी काळात देखील डाळवर्गीय धान्याची मोठी भाव वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Maharashtra News)

latur apmc market, pulses
Python Rescued : प्रतिभा ठाकरेंनी पकडला आठ फुटांचा अजगर, वाचा थरारक घटना

लातूर जिल्हा हा प्रामुख्याने सोयाबीन, ऊस आणि सोबतच तुर, उडीद, मूग हे उत्पादन घेणारा जिल्हा आहे. मात्र यंदा लातूर जिल्ह्यात खरीपाच्या (kharif season) पेरणीत तूर, उडीद मूग या कडधान्य वर्गीय पिकांचा फेरा देखील कमी झाला.

latur apmc market, pulses
108 Ambulance Drivers Call Strike : 'बीव्हीजी' ने शब्द पाळला नाही, 108 आरोग्य सेवा रुग्णवाहिका चालक निघाले संपावर

जिल्ह्यात तूर 64575 हेक्टर तर उडीद 2972 हेक्टर आणि मूग 4460 हेक्टर एवढ्या क्षेत्रावर यंदा पेरणी झाली आहे. सुरुवातीपासूनच पाऊस कमी असल्याने आणि यंदा पेरणी 20 ते 25 दिवस लांबणीवर गेल्याने या पिकांचा पेरा जिल्ह्यात घटला आहे.

लातूरमध्ये उत्पादित केलेल्या तूर, मूग, उडीद या कडधान्यांच्या डाळीला राज्यभर मागणी असते. या डाळवर्गीय पिकांचे उत्पादन घटल्याने लातूरच्या अर्थकारणावर देखील याचा परिणाम होईल असं चित्र सध्या लातूर बाजार समितीत दिसत आहे. याबाबत व्यापा-यांनी देखील साम टीव्हीशी बाेलताना दुजाराे दिला.

latur apmc market, pulses
Mumbai Ahmedabad National Highway Traffic Update: ट्रकने घेतला पेट, गुजरातकडून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतुक खाेळंबली

लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन उडीदाला प्रति क्विंटल भाव 9 हजार 500 रुपये तर मूगाला प्रति क्विंटल 10 हजार 500 रुपये भाव मिळाला आहे. तूरीला मात्र यंदाच्या वर्षातला 11 हजार 700 रुपये असा उच्चांकी भाव मिळाला आहे. दरम्यान या दोन पिकांची आवक घटल्याने हे भाव पुढील काळात वाढण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com