Bailgada Sharyat: पुणे जिल्ह्यातील सात तालुक्यात बैलगाडा शर्यतीवर बंदी; जाणून घ्या जिल्हाधिका-यांचा आदेश

Lumpy Skin Disease Increased In Pune : पशूसंवर्धन विभागाने लसीकरण माेहिमेवर जाेर दिल्याचे सांगितले जात आहे.
bailgada sharyat, bullock cart race
bailgada sharyat, bullock cart racesaam tv
Published On

Pune News : राज्यातील बहुतांश जिल्ह्यात गाई आणि म्हशींमध्ये लम्पी रोगाचा फैलाव वेगाने होत असल्याचे चित्र आहे. यामुळे शेतकरी आणि दूध उत्पादक हैराण झाला आहे. पुणे जिल्ह्यातील सात तालुक्यात जनावरांमध्ये लम्पीचा प्रादुर्भाव वाढला आहे. (Maharashtra News)

bailgada sharyat, bullock cart race
Teachers Day दिवशी महाराष्ट्रातील लाखाे शिक्षक जाणार सामूहिक रजेवर; जाणून घ्या नाराजीचे कारण

शिरुर, दौंड, खेड, आंबेगाव, हवेली, पुरंदर आणि मुळशी तालुक्यात पाळीव गाई वर्णीय जनावरांमध्ये लम्पीचे संक्रमण हाेऊ लागले आहे. लम्पीचे संक्रमण रोखण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडुन जनावरांची वाहतुक, जनावरांचा बाजार बंद ठेवण्याचा आदेश काढण्यात आला आहे.

bailgada sharyat, bullock cart race
Sachin Tendulkar ने नाेटीसीचे उत्तर न दिल्यास..., Bacchu Kadu यांचा प्लॅन तयार (पाहा व्हिडिओ)

या आदेशात पुणे जिल्ह्यातील लम्पी संक्रमित सात तालुक्यात बैलगाडा शर्यतीवरही बंदी घालण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. याबराेबरच चाकण जनावरांचा बाजार ही बंद रहाणार आहे.

bailgada sharyat, bullock cart race
Navi Mumbai : पाण्यासाठी सिडकोत पुन्हा भडका; करंजाडेकरांनी काढला जल आक्राेश माेर्चा

दरम्यान पुण्याप्रमाणे सातारा, अकाेला जिल्ह्यात देखील लम्पीने शेतक-यांची झाेप उडवली आहे. प्रशासनाने या जिल्ह्यांमधील काही तालुक्यात जनावरांच्या वाहतुकीस निर्बंध लावले आहेत. पशूसंवर्धन विभागाने लसीकरण माेहिमेवर जाेर दिल्याचे सांगितले जात आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com