Maharashtra Politics: भाजप-राष्ट्रवादीला सदस्य फुटायची भीती, म्हणून त्यांना गोव्याल हलवले; शिंदेंच्या नेत्याचा टोला

Raigad Politics Heats Up: रायगडमध्ये महायुतीमधील वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. शिवसेना शिंदेगटाचे मंत्री भरत गोगावले यांनी पुन्हा एकदा भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला इशाला दिला. त्यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले.
Maharashtra Politics: भाजप-राष्ट्रवादीला सदस्य फुटायची भीती, म्हणून त्यांना गोव्याल हलवले; शिंदेंच्या नेत्याचा टोला
MahayutiSaam Tv News
Published On

Summary -

  • रायगड जिल्हा परिषद निवडणुकीनंतर राजकीय वातावरण तापले

  • भाजप-राष्ट्रवादीने सदस्य गोव्याला हलवल्याचा आरोप

  • मंत्री भरत गोगावले यांचा पुन्हा भाजप-राष्ट्रवादीवर निशाणा

  • महायुतीतील फूट पडल्याची शक्यता

सचिन कदम, रायगड

रायगडमधील राजकारण आणखी तापले आहे. रायगडमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवेळी वेगळी चूल मांडणाऱ्या भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदेगटाची महायुती तुटण्याची चिन्ह दिसत आहेत. जिल्हा परिषद निवडणूक पार पडल्यापासून याठिकाणी आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. अशामध्ये भाजप, राष्ट्रवादीला सदस्य फुटायची भीती आहे त्यामुळेच त्यांनी गोव्याला सदस्य हलवले असल्याचा टोला मंत्री भरत गोगावले यांनी लगावला आहे.

रायगड जिल्हा परिषदेच्या भाजप आणि राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित सदस्यांना गोव्याला पाठवण्यात आले आहे. यावर बोलताना आम्ही त्यांचे सदस्य उचलू अशी भीती त्यांना असेल असं सांगताना आम्ही एकतरी सदस्य हलवला का? असा खोचक प्रश्नरूपी टोला मंत्री भरत गोगावले यांनी लगावला. यावेळ राष्ट्रवादी-भाजप युतीवर बोलताना 'आम्हाला दूर ठेवलं, तर पुढे विधानसभा आणि लोकसभा निवडणुका आहेत, शिवसेनेची गरज लागेल, तेव्हा आम्ही पाहू काय करायचं ते', असा इशाराही भरत गोगावले यांनी भाजप आणि राष्ट्रवादीला दिला आहे.

Maharashtra Politics: भाजप-राष्ट्रवादीला सदस्य फुटायची भीती, म्हणून त्यांना गोव्याल हलवले; शिंदेंच्या नेत्याचा टोला
Maharashtra Politics: शिंदेसेना करणार भाजपचा गेम? सत्तेचं समीकरण बदलणार, कोण किंगमेकर ठरणार?

रायगडमध्ये सध्या जिल्हा परिषदेच्या सत्ता समिकरणावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी, भाजपमध्ये वाद सुरु आहेत. याआधीच मंत्री भरत गोगावले यांनी सहकारी पक्ष भाजप आणि राष्ट्रवादीला महायुतीमधून बाहेर पडण्याचा थेट इशारा दिला होता. 'भविष्यात लोकसभा, विधान परिषद निवडणुकीमध्ये वेगळा विचार करावा लागेल.', असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. 'त्यांना आमची गरज नसेल तर त्याचा विचार केला जाईल. महतयुतीत एकत्र आहोत तर एकत्र येणे गरजेचे आहे.', असा सल्ला देखील त्यांनी मित्रपक्षांना दिला होता.

Maharashtra Politics: भाजप-राष्ट्रवादीला सदस्य फुटायची भीती, म्हणून त्यांना गोव्याल हलवले; शिंदेंच्या नेत्याचा टोला
Maharashtra Politics: राज ठाकरेंनी ठाण्यात एकनाथ शिंदेंची भेट घेताच उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय; दोन्ही बंधूंमध्ये पुन्हा बिनसलं?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com