गुन्हेवृत्त  SaamTv
महाराष्ट्र

नागपूरमध्ये महिलेचा संशयास्पद मृत्यू; गळ्यावर चाकूचे वार

नागपूरच्या गिट्टीखदान पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या वाडीटोल नाक्याजवळ एका वृद्ध महिलेचा संशयास्पद मृत्यु झाल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे.

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

मंगेश मोहिते

नागपुर : नागपूरच्या गिट्टीखदान पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या वाडीटोल नाक्याजवळ एका वृद्ध महिलेचा संशयास्पद मृत्यु झाल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. माहेड गिरजाशन्कर सिंग असे मृतक ७० वर्षीय महिलेचे नाव असून तिचा गळा चिरल्याने मृत्यू  झाला आहे.

हे देखील पहा -

वाडी टोलनाक्या जवळ अशोक इन्क्लेव अपार्टमेंटच्या पाचव्या माळ्यावर एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून पाहिले असता, या महिलेने फ्लॅटच्या बाल्कनी  मध्ये स्वतः आपल्या गळ्यावर चाकूने वार करून आत्महत्या केल्याचे प्राथमिक दृष्ट्या पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे पोस्ट मार्टम रिपोर्ट आल्यांनतरच हा प्रकार नेमका काय आहे ते उलगडणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

या महिलेचा मुलगा विपीन गिरीजा शन्कर सिंग हा हैद्राबाद ला ट्रान्सपोर्ट चे काम असल्याने तिथेच होता. मात्र, त्याची पत्नी रिंकी आणि लहान मुलगी हि घटनेच्या वेळी फ्लॅटमध्ये उपस्थित होते. आज सकाळी बाल्कनी मध्ये गेल्यावर त्यांना हा प्रकार लक्षात आला. त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती तिचा पती विपीस यास फोनद्वारे दिली. मृतक माहेड सिंग यांना अनिद्रेचा आजार होता आणि ते बऱ्याच दिवसांपासून डिप्रेशन मध्ये होत्या.

मात्र, घरात दररोज साफ सफाई ची आवड असल्याने तीने बाल्कनी मध्ये  स्वतःच्या गळ्यावर चाकू ने हल्ला करून स्वतःची जीवनयात्रा संपवली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या महिलेने आजाराला कंटाळून आत्महत्या केली की काही घातपात आहे? याचा खुलासा शवविच्छेदन अहवाल आल्यावरच पुढे येण्याची शक्यता आहे. गिट्टीखदान पोलीस ठाण्यात याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, सदर घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

AAI Recruitment: एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी; पगार १,४०,००० रुपये; अर्ज कुठे अन् कसा करावा?

एकीकडे राज ठाकरेंची भेटी, दुसरीकडे उद्धव ठाकरेंना फोन; खासदारांनी सगळंच सांगितलं

The Bengal Files: देशातील प्रत्येक मुल त्यांच्यावर प्रेम...;'द बंगाल फाइल्स' चित्रपटावरील वादावर विवेक अग्निहोत्रींचे प्रत्युत्तर

Vi Recharge: Vi देखील देईल धक्का! Jio आणि Airtelनंतर Vi प्लॅन्सवर देखील परिणाम, लवकरच स्वस्त रिचार्ज बंद होण्याची शक्यता

Beed Rain : बीडच्या ११ तालुक्यात अतिवृष्टी; पिकांचे अतोनात नुकसान, सोयाबीनसह कपाशीवर मर रोगाचा प्रादुर्भाव

SCROLL FOR NEXT