पवार साहेब, तुम्ही कधी तरी खरं बोलणार आहे का? - सदाभाऊ खोत

मराठा आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाबाबत घटना दुरुस्तीच्या केलेल्या मागणीवरून आमदार खोत यांनी ही टीका केली आहे.
पवार साहेब, तुम्ही कधी तरी खरं बोलणार आहे का? - सदाभाऊ खोत
पवार साहेब, तुम्ही कधी तरी खरं बोलणार आहे का? - सदाभाऊ खोतSaamTv
Published On

सांगली : "शरद पवार साहेब तुम्ही कधी तरी खरं बोलणार आहे का? तसेच तुमच्या सत्तेची खुर्ची उबवण्याची हौस कोणत्या जन्मात फिटणार आहे" अशी घणाघाती टीका माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर केली आहे. मराठा आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाबाबत घटना दुरुस्तीच्या केलेल्या मागणीवरून आमदार खोत यांनी ही टीका केली आहे. ते सांगली मध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते.

हे देखील पहा -

ओबीसी आणि मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत घटनेमध्ये दुरुस्ती करण्याची मागणी शरद पवार यांनी केली आहे. मात्र, यावरून माजी राज्यमंत्री आमदार सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शरद पवार साहेब तुम्ही ज्येष्ठ आहात आणि तुम्ही कधीतरी खरं बोलणार आहात का? अजून किती वर्षे समाजा-समाजामध्ये तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचा उद्योग करणार आहात.

तसेच तुमच्या राजकारणाची आणि सत्तेची खुर्ची उगवण्याची हौस कोणत्या जन्मात फिटणार आहे ? हे एकदा महाराष्ट्राच्या जनतेला सांगा. अशा शब्दात सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. शरद पवार म्हणाले होती की 102 व्या घटना दुरुस्तीमुळे राज्य सरकारला मागास ठरवण्याचा अधिकार राहिला नाही. त्यामुळे गायकवाड समितीचा अहवाल सर्वोच्च न्यायालयात फेटाळला गेला.

पवार साहेब, तुम्ही कधी तरी खरं बोलणार आहे का? - सदाभाऊ खोत
मंदिर उघडण्याच्या प्रश्नावरून फडणवीस यांचा सरकारवर निशाणा

मात्र, आता घटना दुरुस्ती करून राज्य सरकारला अधिकार मिळाला असेल. तर मग तुम्हा आता परत केंद्राकडे का बोट दाखवता. पहिल्यांदा ओबीसी समाजाचा डेटा गोळा करा. मगच तुम्हाला ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण देता येईल. मात्र तुम्ही डेटा गोळा करणार नाही आणि बोट मात्र केंद्राकडे दाखवणार. मराठा समाज मागासलेला कसा आहे याचा डेटा गोळा करावा लागेल पण हे तुम्ही करणार नाही आणि फक्त केंद्राकडे बोट दाखवणार. त्याच बरोबर घटनेची दुरुस्ती तुम्ही केंद्रात आणि राज्यात साठ वर्ष सत्तेत असताना का केली नाही, तुमचे हात कोणी बांधले होते का ? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com