मंदिर उघडण्याच्या प्रश्नावरून फडणवीस यांचा सरकारवर निशाणा

वढी गर्दी बार मध्ये होते, मॉल मध्ये होते त्यापेक्षा कमी गर्दी मंदिरात होते. सोशल डिस्टन्स ठेवून मंदिरे उघडण्यास काय हरकत आहे. असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला केला आहे.
चुकीच्या बातम्या करु नका; एखादी कमी पडली तर मला मागा- देवेंद्र फडणवीस
चुकीच्या बातम्या करु नका; एखादी कमी पडली तर मला मागा- देवेंद्र फडणवीसSaam tv
Published On

पंढरपूर : जेवढी गर्दी बार मध्ये होते, मॉल मध्ये होते त्यापेक्षा कमी गर्दी मंदिरात होते. सोशल डिस्टन्स ठेवून मंदिरे उघडण्यास काय हरकत आहे. आम्हाला जेथे आहे तेथे देव आहे. मात्र अनेक गरीब लोकांची उपजीविका मंदिरावर अवलंबून आहे. हार वाला ते पुजारी असंख्य गरीब लोकांची उपजीविका मंदिरावर अवलंबून आहे. त्यांच्यासाठी तरी मंदिरे उघडा, मंदिरे बंद ठेवणे सरकारची चूक आहे. तुम्ही दारूची दुकाने उघडी ठेवता मात्र मंदिरे बंद ठेवता, असे म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

हे देखील पहा -

आज सांगोला येथे कै.गणपतराव देशमुख यांच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी तसेच कै.आमदार सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रथम स्मृतिदिना निमित्त पंढरपुरमध्ये आले असता त्यांनी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.

चुकीच्या बातम्या करु नका; एखादी कमी पडली तर मला मागा- देवेंद्र फडणवीस
भाजपची जनआशीर्वाद यात्रा पेट्रोलचे भाव दुप्पट करण्यासाठी आहे का?

गणपतराव देशमुख यांचे विधिमंडळात उचित स्मारक करण्याची मागणी करणार असल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर शाळांच्या बाबत निर्णय घेण्यात सरकार धरसोड करत आहे. पालकांना व विद्यार्थाना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा असे देखील फडणवीस यांनी म्हटले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com