Sushma Andhare Saam Tv
महाराष्ट्र

Sushma Andhare : विधानसभा निवडणूक लढवणार का? सुषमा अंधारे यांनी स्पष्टच सांगितलं

Sushma Andhare latest News : सुषमा अंधारे यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठं भाष्य केलं आहे. ते नागपूर दौऱ्यावर आहेत.

Vishal Gangurde

पराग ढोबळे, साम टीव्ही प्रतिनिधी

नागपूर : राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु झाली आहे. विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारांनी राजकीय पक्षांकडे तिकीटासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. काही वर्षांपूर्वी ठाकरे गटात प्रवेश केलेल्या सुषमा अंधारे यांनी राज्यात मोठा चाहता वर्ग निर्माण केला आहे. गेल्या काही महिन्यात सुषमा अंधारे यांनी अनेक सभा गाजवल्या आहेत. त्यामुळे सुषमा अंधारे निवडणूक लढवण्यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहेत. याचदरम्यान, सुषमा अंधारे यांनी विधानसभा निवडणूक लढवण्यावरून मोठं भाष्य केलं आहे.

सुषमा अंधारे हे नागपूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान, सुषमा अंधारे यांनी विधानसभा निवडणुकीवर मोठं भाष्य केलं आहे. 'मी पक्षासाठी काम करावे निवडणूक लढण्यापेक्षा प्रचार सभा ताकदीने केल्या पाहिजे, अशी इच्छा आहे. विश्रांतवाडी कार्यालय घरापासून लांब आहे. त्यामुळे वडगाव शेरी, शिवाजी नगर, हायवेला ऑफिस असावे म्हणून केले आहे. बापू पठारे हे इच्छुक आहेत. पण आमच्या पक्षाकडे चांगले चेहरे आहेत. हडपसर मागत आहे. कोथरूड मागत आहेत. बारामती मागत नाही. बहुतेक पिंपरी सुटत आहे, असे सुषमा अंधारे यांनी स्पष्ट केलं.

लोकसभेतील सांगली पॅटर्नवर बोलताना अंधारे म्हणाल्या, ' आम्ही रामटेक काँग्रेस लोकसभा सोडली. यात बोलण्यासाठी नाही. तर खासदार आमच्या पक्षाचे होते, मनाचा मोठेपणा दाखवून स्वीकारली. आम्ही प्रचार सुद्धा केला. कॉंग्रेस उमेदवारांसाठी सांगलीतला अनुभव हा वेदनादायी आहे. तो विसरणे कठीण आहे. सांगलीबद्दल विचार करावा लागतो. आमचे नेते राऊत आग्रही आहेत. कारण आमची शक्ती आहे. कामठी, रामटेकमध्ये क्षमता आहे. त्याच जागा मागतो. दर्यापूर, बडनेरा, वाशीम आहे, या ठिकाणी जिंकणारे आमदार होते. आता सर्वेक्षण करतो. आम्ही दोन पाऊले मागे सरकतो, त्यांनी सरकावे'.

'दिल्लीतील राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे नेते समजून घेतील. महाराष्ट्रात निवडणुकीक राहुल गांधी यांचा चेहरा मोठाआहे. तेवढाच महत्वाचा उद्धव ठाकरे यांचा चेहरा आहे. विश्वासक चेहरा शरद पवार यांचा आहे, असेही अंधारे म्हणाल्या.

महाविकास आघाडीतील तिढ्यावर बोलताना अंधारे म्हणाल्या, ' कोणालाही वाटेल मेहनत केली आहे. जागा मिळावी, जास्त ताकद आहे, असे वाटत आहे. पक्षाचे पदाधिकारी रिपोर्ट पाठवतात. अनिल देसाई हे भूमिका मांडतात. आमचे नेते संजय राऊत हे पक्षाच्या हितात निर्णय घेतात बोलतात. त्यानुसार ती भूमिका मांडत आहे. वेगळ काही करायची गरज नाही'.

'बळवंत वानखेडे आमदार होते. आता खासदार आहेत. त्यामुळे दर्यापूर जिंकू शकतो. मशाल पेटवण्यासाठी मदत करू, असे बळवंत वानखडे म्हणाले होते. यशोमती ठाकूर यांच्या समोरासमोर भूमिका मांडली होती, असे त्या म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HDFC बँकेचा ग्राहकांना झटका! ४ नियमांत केले मोठे बदल; तुमचा खिसा रिकामा होणार

Maharashtra Live News Update: पालघरच्या पूर्व आणि पश्चिम भागात मुसळधार पावसाला सुरुवात

Spruha Joshi: स्पृहा जोशीचं सुंदर सौंदर्य पाहून मन होईल घायाळ

Aadhar Card : खुशखबर! आता आधार अ‍ॅपवर क्षणात नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार

Dahi Kachori Recipe: नाश्त्याला बनवा खुसखुशीत दही कचोरी; १० मिनिटांत बनेल अशी रेसिपी

SCROLL FOR NEXT