Beed Crime Suresh Dhas Saam Tv
महाराष्ट्र

Beed Crime : बीडची गुंडगिरी संपवायला निघालेल्या सुरेश धसांचा निकटवर्तीय निघाला कुख्यात गुंड, खोक्याची भाईगिरी संपवणार का?

Beed Crime News : सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण सुरेश धस यांनी लावून धरले. बीडची गुंडगिरी संपवायला निघालेल्या आमदार सुरेश धस यांचा निकटवर्तीय गुंड असल्याची माहिती समोर आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Beed News : बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन हत्या करण्यात आली होती. या प्रकरणामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली. संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी ही मागणी सुरु झाली. दरम्यान भाजपचे बीडचे आमदार सुरेश धस यांनी हे हत्या प्रकरण लावून धरले.

संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांना शिक्षा होण्यासाठी सुरेश धस यांनी प्रयत्न केले. त्यातून पुढे वाल्मीक कराड हे नाव पुढे आले. वाल्मीक कराड हे धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असल्याने धस यांनी मुंडेंवरही वेळोवेळी निशाणा साधला. वाल्मीक कराड हाच हत्या प्रकरणात मुख्य सूत्रधार असल्याचे आरोपपत्रात नमूद करण्यात आले. तेव्हाही मुंडेंवर सुरेश धस यांनी टीका केली होती.

दरम्यानच्या काळात सुरेश धस यांच्या कृतीवरुन आणि विधानांवरुन बीडची गुंडगिरी ते संपवणार असे लोकांना वाटू लागले होते. बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीची प्रकरणे धस यांनी प्रकाशझोतात आणली होती. पण अशातच एक व्हायरल व्हिडीओ समोर आला. या व्हिडीओमध्ये एक तरुण बॅटने गरीबाला अमानूष मारहाण करत असल्याचे पाहायला मिळाले.

व्हायरल व्हिडीओमध्ये गरीबाला मारहाण करणाऱ्या तरुणाचे नाव समोर आले. हा तरुण म्हणजे सतीश भोसले उर्फ खोक्या. हा सतीश भोसले सुरेश धस यांचा निकटवर्तीय असल्याचे समोर आले. त्याच्याकडे भाजपच्या महाराष्ट्र भटक्या विमुक्त आघाडीचे पद आहे. भोसलेवर गुन्हे देखील आहेत. त्यामुळे गुंडगिरी संपवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सुरेश धसांचा निकटवर्तीयच गुंड निघाला असे म्हटले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT