बीड : बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या हत्या प्रकरणाच्या विरोधात विरोधकांसहित सत्ताधारी आमदार सुरेश धस यांनीही आगपाखड सुरु केली आहे. बीडमधील आयोजित निषेध मोर्चात आमदार सुरेश धस यांच्यासह विरोधकांचा टीकेचा रोख थेट मुंडे बहीण भावांवर पाहायला मिळत आहे. या आयोजित मोर्चामध्ये भाजप आमदार सुरेश धस यांनी थेट मंत्री धनंजय मुंडे यांच्यासहित वाल्मिक कराड यांच्यावर जोरदार निशाणा साधला. आरोपींना बिनभाड्याच्या खोलीत बसवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा देखील भाजप आमदार सुरेश धस यांनी दिला.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे पडसाद राज्यभर पाहायला मिळत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडमध्ये संतापाची लाट उसलळी आहे. या हत्येच्या निषेधार्थ आयोजित मोर्च्यात विविध पक्ष, संघटनाचे नेत्यांनी हजेरी लावली. या मोर्च्यामध्ये नागरिकांची लक्षणीय गर्दी पाहायला मिळत आहे.
या मोर्च्यात सुरेश धस म्हणाले,' संतोष देशमुख यांचा अतिशय अमानवीय मृत्यूनंतर आपण येथे आलो आहोत. ज्योती मेटेताई स्टेजवरून खाली उतरल्यावर चप्पल काढा. त्यानंतर गुपचूप हाणा. तरी देखील मला राग येणार नाही कारण नाव राहिलं आहे. आम्ही सभागृहातील म्हटलंय, तुम्ही गोळी घाला किमान, त्यांचा जीव पटकन गेला असता. तुम्हाला या राज्यघटनेप्रमाणे मुंगी मारायला देखील अधिकार नाही. आमच्या बूथ प्रमुखाची चुकीच्या पद्धतीने हत्या केली, ते एकाही माणसाला पटलेली नाही'.
'तुमचे सुपारी एवढे सुद्धा मनगट नाहीत. आता जे माझ्यावर लिहितात, तेच मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात लिहीत होते. तेच त्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात लिहित होते. ३३० बूथपैकी २३० बूथ ताब्यात असतील. तर एवढ्या मतांनी येतील. गोली मारो भेजे मे, असं करत लक्ष्मीपूजन करताना देखील गोळीबार करतात. १२२२ बंदूक लायसन्स ज्या पोलीस अधीक्षकांनी दिले. डीवायएसपीने दिले. त्या त्या अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी. आम्ही आमदार असून आमच्याकडे साधे बंदूक नाही, असे ते पुढे म्हणाले.
'जिस गोली पे नाम होगा, उस गोली मे हम. माझा पंकजा मुडेंना सवाल आहे की, 'संभाजीनगर तुम्ही एअरपोर्टला उतरलात. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीला गेलात. मग वाकडे वाट करून तुम्ही आमच्या देशमुख कुटुंबीयांच्या भेटीला का गेला नाहीत? गोपीनाथ मुंडेंनी गुंडांचा खटका बसवला. आमची औलाद स्वाभिमानी आहे. तुमच्यापुढे जी हुजूर करणारी आमची औलाद नाही. आजपर्यंत पण केला नाही आणि पुन्हा देखील करणार नाहीत. पंकजा मुंडे किमान तुमच्याकडून अपेक्षा होती. तुम्ही देशमुख कुटुंबीयांच्या भेटीला येतात, असे सुरेश धस पुढे म्हणाले.
'तीनशे टिप्पर वाळूचे. पिस्तूल घेऊन येत राख घेऊन जातात. एक रुपया न भरता 500 ट्रक राखेच्या फुकट जातात. मग यावर पंकजा मुंडे तुम्ही का बोलला नाहीत. याचा अर्ध धनंजय मुडे यांचे घर वर आहे. तर पंकजा मुंडे यांचे घर खाली... नाश्त्याला एकाकडे आणि जेवायला एकाकडे हे आहेत. पालकमंत्रिपद नाही तर राज्याचे कृषी खाते देखील भाड्याने दिलं. हार्वेस्टरचे 40 लाखाचे अनुदान हे वाल्मीक कराड यांच्या घरी जात होते, असा गंभीर आरोप सुरेश धस यांनी केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.