बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी राज्यात प्रचारसभांचा धडाका लावला आहे. पंकजा मुंडे यांच्याकडून महायुतीच्या उमेदवारांसाठी दंड थोपटले आहेत. बीड जिल्ह्यातील आष्टी विधानसभा मतदारसंघातही पंकजा मुंडे यांनी सुरेश धस यांच्यासाठी हजेरी लावली. सुरेश धस यांच्यासाठी आयोजित केलेल्या प्रचारसभेत पंकजा मुंडे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. आता रडायचं नाही रडवायचंय, अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी विरोधकांना इशारा दिलाय. तसेच यावेळी पंकजा मुंडे यांनी भीती कशाची वाटते, याची जाहीर सभेत कबुली दिली.
पंकजा मुंडे यांच्या भाषणातील मुद्दे
नरेंद्र मोदींचे प्रत्येक मतदारसंघात निरीक्षक नेमण्यात आले आहेत. त्या प्रत्येकांचा रिपोर्ट दिल्लीपर्यंत चालला आहे.
राज्यात महायुतीची सत्ता आणायची आहे. कारण घडी केली की, पिढी जाते. कुणी अपवादाने, अनावधानाने आमदार होतात, खासदार होतात. पण त्याचा जनतेला काय फायदा होतो? काहीच नाही.
आम्ही लोकसभेला प्रचार करताना सीएए कायदा काढला. विविध योजना देण्यासाठी मुस्लिम बांधव असतील. आम्ही इतरांना कधी जात धर्म विचारला नाही. मात्र, नरेंद्र मोदींच्या विरोधात प्रचार करण्यासाठी महाविकास आघाडीने षडयंत्र रचलं.
नरेंद्र मोदींनी हट्ट केला आणि सरकार आणलं. सत्ता आल्यानंतर सविधान बदलण्यापेक्षा सशक्त करण्याचं काम केलं.
मी तुमच्या पाया पडते. वीस तारखेपर्यंत राहा. पस्तीस टक्के भाव वाढ दिली. आताच कारखान्याला जाऊ नका.
नियतीचा खेळ आहे. मला खासदार लागूच द्यायचं नव्हतं, आमदार लागू द्यायचं होतं, म्हणून मी परत आले.
लोकसभेची परिस्थिती ऐतिहासिक होती. जगावेगळी होती ती पार पडली.
पत्रकाराने प्रश्न विचारला. तुमचा चेहरा नेहमी टवटवीत का असतो? मी त्यांना म्हणाले मला कशाचीही भीती वाटत नाही, कशाचं गम नाही.
पण जर एखाद्या सभेला मी गेले. तिथे जर मला खुर्च्या रिकाम्या दिसल्या. ही बाब घडल्यास मला भीती वाटते.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.