कार्यक्रम संपल्यानंतर संतोष देशमुख यांच्या मुलीला अश्रू अनावर झाले.
काकाच्या गळ्यात पडून रडतेय.
सर्व पक्षीय नेत्यांचे भाषण संपल्यानंतर सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली.
धनंजय मुंडे हे मंत्रिमंडळात असतील तोपर्यंत कुणालाही न्यायाची अपेक्षा नाही. जोपर्यंत तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावर ठेऊ नये.
प्रकाश सोळुंके
संभाजीनगर तुम्ही एअरपोर्टला उतरलात.. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीला गेलात.. मग वाकडे वाट करून तुम्ही ते आमच्या देशमुख कुटुंबियांच्या भेटीला का गेला नाहीत...? सुरेश धस यांचा पंकजा मुंडेंना सवाल
ज्योतीताई स्टेजवरून खाली उतरल्यावर चप्पल काढा आणि गुपचूप हाना तरी देखील मला राग येणार नाही कारण नाव राहिलं...
संतोष देशमुख यांच्या हत्येची पद्धत खूप चुकीची होती
आम्ही सभागृहातील म्हटलंय तुम्ही गोळी घाला किमान त्याचा जीव पटकन गेला असता
पण घालायचा का
या राज्यघटनेप्रमाणे मुंगी मारायला देखील तुम्हाला अधिकार नाही
तुम्ही सर्वजण माझ्यासोबत राहा आणि माझ्या वडिलांना न्याय द्या. पुन्हा असा अन्याय होऊ नये म्हणून एकत्र या.
गोदावरी नदीतून हजारो हायावा वाळू उपसा करतात
वाल्मीक कराड यांच्या पाठीमागे ज्यांनी आपली शक्ती उभी केली ते धनंजय मुंडे मंत्रिमंडळात असल्यास या केस मध्ये न्यायाची अपेक्षा नाही
जोपर्यंत आरोपींना फाशी होत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांचे मंत्रीपद काढून घ्यावं
आमदार प्रकाश सोळुंखे यांची मोठी मागणी
आजचा मोर्चा हा आपला पहिला पाऊल आहे
मी ओबीसी आहे, मी ठामपणे सांगतो वाल्मीक कराड याला आत टाका
आपण सर्व आमदारांचे भाषण ऐकले
हा कोणत्या जातीपातीचा विषय नाही
म्हणून आपल्याला सर्व लोकांनी साथ दिली आहे
त्यामुळं मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री यांनी सागितलं जो कोणी दोषी असेल त्याला सोडणार नाही
आणखीन सुरेश अण्णा त्या सभागृहात बोलले असते तर सभागृह ढसाढसा रडेल, असं संदीप क्षिरसागर म्हणाले.
संतोष अण्णा यांची जी हत्या केली आहे त्याला कोणता जातीय रंग न देता पहावं
स्थानिक पोलिसांचं अपयश पाहिलं त्यामुळे हा तपासाता सीआयडी कडे आहे
आम्ही कायम देशमुख कुटुंबियांच्या सोबत आहोत
आमच्या मधून आमचा संतोष देशमुख निघून गेला आहे आणि हे ज्याच्यामुळे घडलं आहे त्या वाल्मीक कार्याला घोडा लावल्याशिवाय मी गप्प बसणार नाहीत
जोपर्यंत वाल्मीक कराड पकडत नाही तोपर्यंत अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून हाकलून दिले पाहिजे
आता शांत बसायचं नाही जोपर्यंत निर्णय लागत नाही तोपर्यंत शांत बसायचं नाही
वाल्मीक कराडला अटक का नाही? असा सवाल बीडमध्ये मूक मोर्चात उपस्थित करण्यात आला. धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.
मस्साजोग येथील माजी सरपंच स्व. संतोष देशमुख आणि परभणी मधील सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी अमरावती शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या परिसरात एक दिवसीय ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात माजी मंत्री व प्रहार चे अध्यक्ष बच्चू कडू यांनी उपस्थिती लावली, दरम्यान बच्चू कडू यांनी राज्य सरकारवर सडकून टीका करत, सरकारला आव्हान दिलं.
सत्तेपुढे शहाणपणा चालत नाही अशी म्हण आपल्याकडे आहे.. माझे मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे ही म्हण अधोरेखित करायची नसेल तर अतिशय स्वच्छपणे कारवाई झाली पाहिजे आणि करायची असेल तर स्पष्टपणे सांगितले पाहिजे की होय हे आमचे गुंडे आहे व झालेल्या घटनेवर पारदर्शकपणे कारवाई होणे आवश्यक आहे... सत्य महत्त्वाचे असते सत्ता महत्त्वाची नसते... हे लोकांना सांगणे गरजेचे आहे... नाहीतर याचे मोठे परिणाम उद्या सरकारला भोगावे लागतील असा इशारा बच्चू कडू यांनी सरकारला दिला, माजी सरपंच संतोष देशमुख व सोमनाथ सूर्यवंशी यांना यावेळी श्रद्धांजली देत सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आल्या, आरोपींना तात्काळ पकडा व त्यांना फासावर लटकवा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा धाराशिव मध्ये छञपती शिवाजी महाराज चौकात शिवराज्य अभिषेक सोहळा समितीच्या वतीने निषेध करण्यात आलाय.यावेळी देशमुख यांच्या मारेकऱ्याला कठोर शिक्षा व्हावी अशा घोषणा देत हाताला काळी फीत बांधून शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडमध्ये आज सर्वपक्षीय मूक मोर्चा निघाला आहे. 'आका'ला अटक करून फाशी द्या. मूक मोर्चामध्ये जोरदार घोषणाबाजी केली. संतोष देशमुख यांचे कुटुंबीय या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
Beed protest Santosh Deshmukh case Live Updates : मनोज जरांगे पाटील मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत. बीडमधील सर्वपक्षीय मोर्चाला सुरुवात झाली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार घालून मोर्चाला सुरुवात झाली. छत्रपती संभाजीराजे, मनोज जरंगे पाटील, सुरेश धस, संदीप क्षीरसागर, ज्योती मेटे सहभागी झाले.
सरकार या गुंडगिरीचा बंदोबस्त करत नसेल तर आम्ही बंदोबस्त करू. सरकार आरोपींना पाठीशी घालत असल्यास दिसून येत आहे. इतके दिवस आरोपीला शोधत नाहीत, म्हणजे त्यांना लपवून ठेवलं असं लोकांचं म्हणणं आहे, ते बरोबर आहे, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
या खंडणीच्या गुन्ह्यात अनेकांचे नाव आहे, मात्र तो या गुन्ह्यात जामीन मिळत असताना समोर येत नाही. याचा अर्थ खुनाच्या गुन्ह्यात देखील त्यांचा हात आहे. यांचे जे बॉडीगार्ड होते त्यांची चौकशी करावी, अन् त्यांना निलंबित केलं पाहिजे. आम्ही मोर्चात सहभागी न झाल्यास लोक जोड्याने मारतील. कुणाच्या बापासाठी कुणी दाडी पण करत नाही, असे सुरेश धस म्हणाले.
आज संतोष देशमुख यांच्या हत्येला 19 दिवस पूर्ण झाले आहेत. देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून देऊ अशी भूमिका मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केली. परंतु दुर्दैवाने दोन्ही घटनेतील आरोपी अद्याप अटक नाही. याबद्दल सर्वसामान्य माणसात आक्रोश आहे. या मोर्चाची दखल सरकारने घ्यावी. अन्यथा पुढील दिशा आम्ही वेळोवेळी ठरवू, असा इशारा प्रकाश सोळंके यांनी दिला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड प्रकरणातील आरोपीला सोडले जाणार नाही असं म्हटले असतानाही आमदार सुरेश धस यांना आपले मुख्यमंत्री म्हणतात कोणालाही सोडणार नाही हे तुम्हाला मान्य नाही का? मारेकऱ्यांना गुन्हेगारांना शिक्षा द्यायची की आपली राजकीय पोळी भाजायची आहे याचा प्रत्येक आलाय. कोणी कोणाच्या कार्यक्रमाला जायचं काय करायचं हा त्या अभिनेत्रींचा खाजगी आयुष्य आहे. वाटेल ते आरोप करत आहात वाटेल ते बोलत आहात लोकशाही आहे ठीक आहे पण या घटनेचा तपास सुरू आहे. तपासात व्यक्त येण्याचं काम सुरेश धस करत आहेत. अमोल मिटकरी यांना धमकी दिले जाते यावरून कळतं की बीडमध्ये गुन्हेगारी कोणाची वाढलेली आहे. पोलीस यंत्रणा सीआयडी त्यांचं काम करत आहेत गुन्हेगाराला शिक्षा होईल पण सुरेश धस यांनी यावर आपले वक्तव्य करू नयेत. आमदार सुरेश धस यांनी पहिल्यांदा स्वतःकडे बघितलं पाहिजे बीडची परिस्थिती ही का झाली यातून राजकीय पोळी भाजून नये सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन देशमुख यांच्या आरोपीला शिक्षा होईल यासाठी प्रयत्न करावेत, असे रुपाली पाटील म्हणाल्या.
आमदार सुरेश धस मोठा ताफा घेऊन बीडमध्ये दाखल
बीड शहरातील बार्शी नाका परिसरातून सुरेश धस यांचा ताफा शासकीय विश्राम ग्रहाकडे रवाना
मोर्चात होणार सहभागी
राज्याचे मुख्यमंत्री त्यांच्या पाठीशी आहेत. त्यांना शंभर टक्के न्याय मिळणार, कारण त्यांनी ॲक्शन अतिशय जोरात घेतली आहे. मात्र जो लोकांच्या मनात राग आहे तो व्यक्त करण्यासाठी लोक प्राथमिक स्वरूपात या मोर्चात सहभागी होतील, असे सुरेश धस यांनी सांगितले.
Beed protest Santosh Deshmukh case Live Updates :
संतोष देशमुख यांनी क्रूर हत्या झालीय, महाराष्ट्र मध्ये भीषण परिस्थिती झालीय, मला बोलायला लाज वाटते महाराष्ट्राचे बीड झालं आहे, 19 दिवस झाले अजून अटक नाही, वाल्मिक कराड बेपत्ता आहे. मुख्यमंत्र्यांना विनंती आहे कौशल्य दाखवा, खऱ्या आरोपीला अटक करून दाखवावी.
छत्रपती संभाजीराजे
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज बीड येथे सर्वपक्षीय शांतता मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे .दरम्यान बीडच्या मोर्चानंतर राज्यभर मराठ्यांचे मोर्चे निघणार असून प्रत्येक जिल्ह्यातील मराठ्यांनी मोर्चाच्या तयारीला लागा अस आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केल आहे.. मुख्यमंत्री साहेब तुम्ही संतोष देशमुख यांच्या आरोपींना सोडू नका आता ॲक्शन मोडवर या असं आवाहन देखील मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केल आहे . तर दोन-चार दिवसांपूर्वी आरोपीला पळून लावण्यासाठी सह्याद्रीवर बैठक झाली का असा सवाल देखील जरांगे यांनी उपस्थित केला आहे.
आता संतोष देशमुख यांना आधार द्यायचा तर तुम्ही राजकारण करतात, विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी हे बंद करावं. आमच्या संतोष भैय्याचा खून झाला येथे सत्ताधाऱ्यांनी आणि विरोधकाने राजकारण करू नका, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरण..
सीआयडीचे तपासी अधिकारी सचिन पाटील यांचा मिडीयाशी बोलण्यास नकार
चौकशी सुरू असल्यामुळे काही बोलणार नाही, असेही सांगितलं..
संतोष देशमुख यांचे कुटुंबीय बीडच्या दिशेने रवाना झाले आहेत. बीड येथे होत असलेल्या मोर्चात सहभागी होणार आहेत. भावनिक वातावरणात संतोष देशमुख यांच्या प्रतिमेचे दर्शन घेऊन कुटुंबीय बीडच्या दिशेने रवाना झाले.
बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करा, खंडणी प्रकरणातील गुन्हा दाखल झालेल्या आरोपींना तात्काळ अटक करा, खंडणीतील आरोपींवर संतोष देशमुख यांच्या हत्येच्या कायदेशीर रित्या गुन्हा दाखल करा, यासह मस्साजोग येथे कायमस्वरूपी पोलीस चौकी मंजूर करावी, या प्रमुख मागण्यांसाठी बीडमध्ये आज सर्वपक्षीय भव्य मूक मोर्चा निघत आहे.. तर या मोर्चामध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील, छत्रपती संभाजी राजे भोसले, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड, भाजप आमदार सुरेश धस, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळुंके, आमदार विजयसिंह पंडित यांच्यासह अन्य नेते मंडळी देखील सहभागी होणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.