Supriya Sule on Ajit Pawar  Saam TV
महाराष्ट्र

Supriya Sule: अजित पवारांसोबत जाणार का? राष्ट्रवादीच्या मासिकेत सुप्रिया सुळेंचं स्पष्टीकरण; शरद पवार अन् जयंत पाटील यांच्याशी चर्चा..

Supriya Sule on Ajit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसच्या २६व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने सुप्रिया सुळे यांनी पक्षाच्या मासिकेत लेख लिहिला. तसेच अजित दादांसोबत जाणार की नाही? याबाबत आपल्या भूमिकेवर प्रकाश टाकला.

Bhagyashree Kamble

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का? काका पुतण्याचं मनोमिलन होणार का? अशी चर्चा रंगली होती. एकत्र घेत असलेल्या बैठकांमुळे या चर्चेला अधिक बळ मिळालं होतं. आज राष्ट्रवादी काँग्रेसचा २६ वा वर्धापन दिन आहे. या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीच्या मासिकात लेख लिहिला. दादांसोबत जाणार की नाही? शरद पवार आणि जयंत पाटील यांच्यासोबत काय चर्चा झाली? यासंदर्भात त्यांनी माहिती दिली.

राष्ट्रवादीच्या मासिकेत सुप्रिया सुळे यांनी अनेक मुद्दे मांडले. तसेच अजित पवार यांच्यासोबत जाणार की नाही? यावरही स्पष्टीकरण दिलं. 'अजित पवार यांच्यासोबत जाण्याबाबत माझी कोणतीही चर्चा शरद पवार किंवा जयंत पाटील यांच्यासोबत झालेली नाही,' असे स्पष्ट मत खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीच्या मासिकेत मांडलं.

त्या म्हणाल्या, "आम्ही एक कुटुंब म्हणून सोबत आहोत. विचारांमध्ये मतभेद असू शकतात, मात्र मनभेद होऊ नयेत, हीच आमची भूमिका आहे", असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

यासोबतच त्यांनी पुढील राजकीय घडामोडींबाबत संयमी भूमिका मांडली. "आमचे ८ खासदार पुढे काय निर्णय घेतात, हे पाहावे लागेल," असं सुळेंनी स्पष्ट केलं. शेवटी त्यांनी त्यांच्या खास शैलीत, "सध्या लग्न ठरवण्याचे काम सुरू आहे... आधी 'राष्ट्र' ठरवू, मग 'महाराष्ट्र'चा निर्णय घेऊ", असं त्या म्हणाल्या.

सुप्रिया सुळेंच्या पोस्टवरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

आज राष्ट्रवादी काँग्रेसचा २६ वा वर्धापन दिन आहे. या निमित्ताने पुण्यात मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याआधी त्यांनी एक पोस्ट शेअर केली होती. त्या पोस्टमध्ये त्यांनी, 'सहन करायला शिका' अशी पोस्ट शेअर केली होती. त्यांनी या पोस्टनंतर आज स्पष्टीकरण दिलं. 'माझ्या आईनं दिलेला सल्ला स्टेट्सवर ठेवला आहे. ते माझं व्यक्तिक मत आहे', असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Influencer Death : प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरचं निधन; ३२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, नेमकं कारण काय?

Maharashtra Live News Update: - नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ भागातून भाजपला खिंडार

Vande Bharat Express : देशात १८६ वंदे भारत एक्सप्रेस धावतात, महाराष्ट्रात संख्या किती? वाचा

Local Body Election : आचारसंहिता लागू झाल्यानंतर कोणत्या गोष्टींवर लागणार निर्बंध? जाणून घ्या

Horoscope 6 November: या राशींसाठी आजचा दिवस असेल खास, तुमची रास कोणती?

SCROLL FOR NEXT