Rasta Roko Aandolan Saam tv
महाराष्ट्र

Rasta Roko Aandolan : मनोज जरांगे यांच्या उपोषणाला समर्थन; परभणी, लातूरमध्ये चक्काजाम आंदोलन

Parbhani Latur News : मराठा आरक्षणासाठी काढलेल्या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यात यावी; या मागणीसाठी आज राज्यभरात चक्काजाम आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.

Rajesh Sonwane

राजेश काटकर/ संदीप भोसले 

परभणी/ लातूर : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरु केले आहे. दरम्यान मराठा आरक्षणासाठी (Maratha Aarkshan) काढलेल्या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यात यावी; या मागणीसाठी आज राज्यभरात चक्काजाम आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. त्यानुसार (Parbhani) परभणी, लातूरमध्ये चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. (Maharashtra News)

परभणी जिल्ह्यामध्ये ठीकठिकाणी चक्काजाम आंदोलन सुरू असून परभणी शहरातील जिंतूर- परभणी महामार्गावरील विसावा कॉर्नर व काळी कमान येथे मराठा तरुणांनी चक्काजाम आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात (Devendra Fadnavis) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. याबरोबरच परभणी बस विभागातील सातही आगारातील बस वाहतूक खबरदारीचा उपाय म्हणून सकाळपासून बंद करण्यात (Maratha reservarion) आली आहे. यावेळी आंदोलनकांनी जोरदार सरकार विरोधात घोषणाबाजी केली. ह्यामध्ये महिलांचा सहभाग दिसून आला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

लातूर- बार्शी महामार्ग अडवला
लातूर : मनोज जरांगे यांच्या उपोषणाला राज्यभरातून पाठिंबा देण्यात येतो आहे. राज्यातील ठिकठिकाणी मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान लातूर- बार्शी महामार्ग लातूरच्या (Latur) मुरुड येथे मराठा समाजातील आंदोलकांनी गेल्या एक तासापासून आडवून धरला. यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या आहेत. दरम्यान मनोज जरांगे यांच्या समर्थनात हा रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Sweating : पावसाळ्यात जास्त घाम का येतो? यावर उपाय काय?

When to do heart checkup: भारतातील 30% मृत्यू हार्ट अटॅकमुळेच! धोका टाळण्यासाठी कोणत्या टेस्ट करणं गरजेचं आणि कधी?

Vice President Election : उपराष्ट्रपतींची निवडणूक कशी होते? नेमकी प्रक्रिया काय असते? जाणून घ्या सविस्तर

UPI Payment: आता पिनशिवाय होणार UPI पेमेंट, फक्त तुमच्या फेस लॉकने

Snake Bite: साप चावल्यावर लगेच काय करावे?

SCROLL FOR NEXT