Unseasonal Rain : वीज अंगावर पडल्याने एकाचा मृत्यू; बुलढाण्यात अवकाळी पावसाचा तडाखा, रब्बी पिकावर मोठा परिणाम

Buldhana News : हवामान विभागाने अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यानुसार बुलढाणा जिल्ह्यात १५ फेब्रुवारीला सायंकाळी अवकाळीचा जोरदार तडाखा बसला.
Unseasonal Rain
Unseasonal RainSaam tv
Published On

बुलढाणा : हवामान अंदाजानुसार बुलढाणा जिल्ह्यात अचानक मेघ गर्जनेसह दमदार पाऊस झाला. जवळपास (Buldhana) एक तास जिल्ह्याच्या सर्वच भागात पाऊस झाला. दरम्यान अंगावर (Lighting Stirke) वीज पडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना देखील घडली आहे.  (Tajya Batmya)

Unseasonal Rain
Sanjay Raut: 'हा देशातील शेतकऱ्यांचा अपमान' संजय राऊतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले...

हवामान विभागाने अवकाळी पावसाची (Rain) शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यानुसार बुलढाणा जिल्ह्यात १५ फेब्रुवारीला सायंकाळी अवकाळीचा जोरदार तडाखा बसला. या अवकाळी पावसाने रब्बी पिकावर मोठा परिणाम होणार असून (Wheat) गहू, हरबरा, तूर, कांदा पिकाचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या पावसामुळे (Farmer) शेतकऱ्यामध्ये चिंता वाढली आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Unseasonal Rain
Pandharpur News : चंद्रभागा नदी कोरडी; पंढरपूरच्या माघी यात्रेच्या तोंडावर भाविकांची गैरसोय

वीज पडून एकाचा मृत्यू 

दरम्यान काही भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. या दरम्यान शेगांव तालुक्यातील टाकळी विरो येथे अंगावर विज पडल्याने एका युवकाचा मृत्यू झाला. सूरज निंबाळकर असे मृत्य झालेल्या युवकाचा नाव असून सायंकाळी पेट्रोल पंपावर कामासाठी घरून निघाला होता, रस्त्यातच त्याच्या अंगावर वीज कोसळली व त्यात त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com