मयुर राणे, मुंबई|ता. १६ फेब्रुवारी २०२४
देशाच्या राजधानीकडे हजारो शेतकरी पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश त्या भागातून निघाले आहेत. आणि त्यांना रोखण्यासाठी दिल्लीच्या सिमेवर रस्त्यावर खिळे ठोकणे सशस्त्र पोलिसांना उभे करणे, असे प्रकार या स्वतंत्र हिंदुस्थानामध्ये लोकशाहीतून निवडून आलेल्या सरकारला आणि जे सरकार शेतकऱ्यांना निवडून दिले आहे त्या सरकारलाही शोभत नाही, अशा शब्दात संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
"शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव हा देशातल्या शेतकऱ्यांचा प्रश्न आहे आणि पंजाबचे शेतकरी हे संपूर्ण देशातल्या शेतकऱ्यांचा आवाज उठवत आहेत, अशी भूमिका माननीय उद्धव ठाकरे साहेबांची आहे त्यामुळे या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला महाराष्ट्रातून कसे योगदान देता येऊ शकेल याच्याविषयी त्यांच्या मनामध्ये काय विचार आहेत लवकर ते भूमिका स्पष्ट करतील.
"2014 पासून सातत्याने मोदी शेतकऱ्यांना हमीभाव मिळाला पाहिजे अशी मागणी करत आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री असताना एक जो कार्यगट निर्माण केला होता, त्याचा एक अहवाल मोदींच्या नेतृत्वाखाली तयार झाला आणि तो अहवाल नरेंद्र मोदी त्यांनी प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांना सादर केला. आमची सुद्धा शिफारस आहे की शेतकऱ्यांना किमान हमीभाव मिळाला पाहिजे. तेच मोदींना दहा वर्षात कळत नाही. शेतकऱ्यांच्या काय फायदा झाला तुम्ही इनकम डबल करणाऱ्या शेतकऱ्यांना हमीभाव देणारा होता," असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
"स्वामीनाथन यांना भारतरत्न दिला मात्र त्यांच्या शिफारशी स्विकारायला तयार नाहीत. आणि शेतकरी दिल्लीकडे जात असताना त्यांच्यावर बंदूक तोफा रोखणे, रणगाडे रोखणे, जखमी करणे हे प्रयोग सुरू असताना नरेंद्र मोदी प्रदेशात अबुधाबीच्या राजाबरोबर मेजवानी झोडत आहेत हा या देशातील शेतकऱ्यांचा मोठा अपमान आहे," अशी टीकाही राऊतांनी यावेळी केली. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.