पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यूएई दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. आज बुधवारी यूएईची राजधानी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तेथील पहिल्या हिंदू मंदिराचं उद्घाटन झालं. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केलं. ' मंदिर स्थापनेत यूएईच्या शेख मोहम्मद यांची मोठी भूमिका आहे. त्यांनी माझी इच्छा पूर्ण केली, असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. (Latest Marathi News)
१. मंदिर हे मानवतेसाठी स्वागतार्ह आहे. मंदिर पूर्ण जगात लोकांमधील सलोखा आणि एकतेचे प्रतिक बनेल. यूएई सरकारने भारतातील लोकांची इच्छा पूर्ण केली. १४० कोटी भारतीयांचं हृदय जिंकलं आहे. या मंदिरामुळे यूएईमध्ये येणाऱ्यांची संख्या वाढेल. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
२. भारत आणि यूएई यांची मैत्री विश्वासाचं एक उदाहरण म्हणून पाहिलं जाईल. मागील वर्षात या दोन्ही देशांच्या मैत्रीने मोठी उंची गाठली आहे. भारत देश फक्त वर्तमानाचा विचार करत नाही. आमचं आपल्या देशाशी नाते हजारो वर्ष जुनं आहे. अरब देश हा शेकडो वर्षांपूर्वी भारत आणि यूरोपमधील व्यापारादरम्यान ब्रिजची भूमिका निभावली आहे.
३. मंदिर हे फक्त उपसानेचं स्थळ नाही. खरंतर हे मानवतेचं हेरिटेज आहे. भारत आणि अरब देशातील नागरिकांच्या प्रेमाचं प्रतीक आहे.
४. मी अभिमानाने सांगतो की, मी भारत मातेचा पुजारी आहे. ईश्वराने जितका वेळ दिला आहे, शरीर दिलं आहे. शरीराचा कणकण भारत मातेसाठी आहे. भारतातील १४० कोटी लोक माझे आराध्य दैवत आहे. मी भाग्यवान आहे की, मी आधी अयोध्या येथील राम मंदिर आणि अबू धाबी येथील मंदिराचा साक्षीदार ठरलो.
५. आमच्या विविधतेत विशेषता आहे. मंदिरातील पावला-पावलावर विविधतेत विश्वास दिसेल. यूएईने भारतीय कामगारांसाठी रुग्णालय तयार करण्यासाठीही जमीन दिली आहे. संपूर्ण पृथ्वी आमचं कुटुंब आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.