Farmers Protest Delhi: केंद्र सरकारविरोधात शेतकरी संघटना आक्रमक; आज भारत बंदची हाक, काय सुरू अन् काय बंद? वाचा...

Bharat Bandh News: केंद्र सरकारविरोधात देशभरातील शेतकरी संघटना आक्रमक झाल्या असून शुक्रवारी (१६ फेब्रुवारी) भारत बंदची हाक देण्यात आली आहे.
Shetkari Andolan Bharat Bandh Photo
Shetkari Andolan Bharat Bandh PhotoSaam TV
Published On

Shetkari Andolan Bharat Bandh News

केंद्र सरकारविरोधात देशभरातील शेतकरी संघटना आक्रमक झाल्या असून शुक्रवारी (१६ फेब्रुवारी) भारत बंदची हाक देण्यात आली आहे. सर्व समविचारी शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन बंदमध्ये सहभागी व्हावं, असं आवाहन संयुक्त किसान मोर्चानं केलं आहे. हा बंद ग्रामीण भारतापुरता मर्यादित असणार आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Shetkari Andolan Bharat Bandh Photo
Delhi Fire News: दिल्लीतील पेंट फॅक्टरीला भीषण आग; ११ कामगारांचा होरपळले, थरकाप उडवणाऱ्या घटनेचा VIDEO समोर

सुमारे दीड वर्षापूर्वी शेतकरी संघटनांनी कृषी कायद्याच्या विरोधात संप पुकारला होता. शेतीमालाला हमी भाव मिळावा, तसेच कर्जमाफी करून वीजदरात वाढ करू नका, अशा मागण्या शेतकऱ्यांनी केल्या होत्या. सरकारने दिलेल्या आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं होतं. (Latest Crime News)

मात्र, दीड वर्षाच्या कालावधी लोटला, तरीही सरकारने मागण्या मान्य केल्या नसल्याचा आरोप शेतकरी संघटनांकडून करण्यात आला आहे. याच मागण्या घेऊन शेतकरी पुन्हा रस्त्यावर उतरले आहेत. ‘दिल्ली चलो’ दिल्लीचा नारा देत हजारो शेतकरी राजधानी दिल्लीच्या दिशेने कूच करीत आहेत.

दरम्यान, शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी दिल्लीला लागून असलेल्या सर्व राज्यांच्या सीमा सील केल्या आहेत. रस्त्यावर ठिकठिकाणी बॅरिकेट्स लावण्यात आले असून काटेरी कुंपन तसेच खिळेही ठोकण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी अनेक ठिकाणी अश्रूधुराचा वापरही सुरू आहे.

त्यामुळं आता शेतकरी संघटनांनी आता आंदोलन तीव्र करण्याचं ठरवलं आहे. सेंट्रल ट्रेड युनियन आणि संयुक्त किसान मोर्चानं बंदची हाक दिली आहे. त्यानुसार, सकाळी ६ ते दुपारी ४ वाजेपर्यंत हा बंद पाळला जाणार आहे. शहरी भागात या बंदचा कुठलाही परिणाम होणार नसल्याचं समजतं.

काय सुरू काय बंद?

देशव्यापी संपामुळं वाहतूक, कृषी कामे, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (मनरेगा) ग्रामीण कामे, खासगी कार्यालये, गावातील दुकानं आणि ग्रामीण औद्योगिक व सेवा क्षेत्रातील संस्था बंद राहण्याची शक्यता आहे. रुग्णवाहिका कामकाज, वृत्तपत्र वाटप, लग्नसमारंभ, मेडिकल दुकाने, बोर्डाच्या परीक्षेला जाणारे विद्यार्थी आदी आपत्कालीन सेवांवर संपाचा परिणाम होण्याची शक्यता नाही.

Shetkari Andolan Bharat Bandh Photo
Bharat jodo Nyaya Yatra : भदोहीत पोहोचली भारत जोडो न्याय यात्रा; राहुल गांधींचा थेट शेतात मुक्काम, काय आहे कारण?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com