Weather Forecast: विदर्भात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; गारपिटीमुळे पिकांची नासधूस, आज 'या' भागात कोसळणार

Maharashtra Rain Alert: विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा तसेच यवतमाळ जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी गारपीट झाल्याने शेतीपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं
Weather Forecast Today 16 February 2024
Weather Forecast Today 16 February 2024 Saam TV
Published On

Maharashtra Unseasonal Rain Update

विदर्भातील अनेक जिल्ह्यांना गुरुवारी (११५ फेब्रुवारी) अवकाळी पावसाने चांगलाच तडाखा दिला. बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा तसेच यवतमाळमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी गारपीट झाल्याने शेतीपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Weather Forecast Today 16 February 2024
Pune Accident News: पुण्यातील नवले पुलाजवळ भीषण अपघात; भरधाव डंपरने खासगी बसला उडवलं, थरारक घटना

पुढील दोन ते तीन दिवस हवामानाची अशीच स्थिती राहील, असं हवामान खात्याकडून सांगण्यात आला आहे. दरम्यान, शुक्रवार आणि शनिवारी मराठवाड्यासह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. (Latest Marathi News)

अकोला जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यातल्या काही भागात शुक्रवारी अवकाळी पावसानं हजेरी लावली. जिल्ह्यातील बाळापूर, वाडेगाव, उरळसह गावात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस (Heavy Rain) झाला. या पावसाने काढणीला आलेली खरीप हंगामातील पीके उद्ध्वस्त झाली.

याशिवाय रब्बी पिकांचं देखील नुकसान झालं आहे. दुसरीकडे बुलढाणा जिल्ह्यातही शुक्रवारी अचानक ढगाळ वातावरण तयार झाले. दुपारनंतर मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. जवळपास एक तास जिल्ह्याच्या सर्वच भागात पाऊस कोसळला.

त्यामुळे जिल्ह्याच्या मुख्यालयी तसेच अनेक तालुक्यातील विद्युत पुरवठा काही काळ खंडित झाला होता. अवकाळीमुळे रब्बी पिकावर मोठा परिणाम होणार असून गहू, हरबरा, तूर , कांदापिकाचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

शेगांव तालुक्यातील टाकळी विरो येथील एका युवकाचा अंगावर विज पडल्याने मृत्यू झाला आहे. सूरज निंबाळकर असे मृत्य झालेल्या युवकाचा नाव असून सायंकाळी पेट्रोल पंपावर कामासाठी घरून निघाला होता, रस्त्यातच त्याच्या अंगावर विज कोसळली व त्यात त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

Weather Forecast Today 16 February 2024
Breaking News: मनोज जरांगेंची तब्येत खालावली; मुख्यमंत्री शिंदेंची थोड्याच वेळात पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com