Pandharpur News
Pandharpur NewsSaam tv

Pandharpur News : चंद्रभागा नदी कोरडी; पंढरपूरच्या माघी यात्रेच्या तोंडावर भाविकांची गैरसोय

Pandharpur News : येत्या २० फेब्रुवारीला माघी यात्रेचा सोहळा साजरा होत आहे. यात्रेसाठी राज्यभरातून किमान चार ते पाच लाख भाविक येतील असा प्रशासनाचा अंदाज आहे.
Published on

पंढरपूर : माघ एकादशीनिमित्ताने पंढरपूरमध्ये दरवर्षी माघी यात्रा भरत असते. या माघी यात्रेच्या सोहळ्यासाठी भाविक (Pandharpur) पंढरपूरमध्ये येत असतात. मात्र यात्रा अगदी तोंडावर असताना चंद्रभागा नदी कोरडी पडली आहे. त्यामुळे माघी यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांच्या स्नानाची गैरसोय होणार आहे. (Latest Marathi News)

Pandharpur News
Weather Forecast: विदर्भात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; गारपिटीमुळे पिकांची नासधूस, आज 'या' भागात कोसळणार

येत्या २० फेब्रुवारीला माघी यात्रेचा सोहळा साजरा होत आहे. यात्रेसाठी राज्यभरातून किमान चार ते पाच लाख भाविक येतील असा प्रशासनाचा अंदाज आहे. माघी यात्रेला आलेले भाविक चंद्रभागा स्नान (Chandrabhaga River) करण्यासाठी गर्दी करत आहेत. यात्रा अवघ्या चार दिवसावर आली आहे. तरीही चंद्रभागा नदी कोरडी ठाक पडली आहे. नदी पात्रात पुरेसे पाणी नसल्याने भाविकांची मोठी कुचंबना होत आहे. (Ekadashi) नदीत पाणी सोडल्यास भाविकांसाठी सोया होऊ शकेल. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Pandharpur News
Unseasonal Rain : अवकाळी पाऊस बरसला; कृषी उत्पन्न बाजार समितीतील धान्य भिजले

घाण पाण्यातच करावे लागतेय स्नान 

चंद्रभागा नदीत नदीत स्नान भाविकांसाठी भाग्याचे मानले जात असते. परंतु पाणी नसल्याने येथे आलेल्या भाविकांना पात्रात साचलेल्या घाण पाण्यातच स्नान करावे लागत आहे. प्रशासनाने यात्रेपूर्वी बंधाऱ्यातून नदीपात्रात पाणी सोडावं अशी मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com